रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ, महिला सफाई कर्मचाऱ्याकडून बाळंतिणीला इंजेक्शन

| Updated on: Jan 27, 2020 | 4:40 PM

वाशिममध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला (Injection from cleaning staff) आहे.

रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ, महिला सफाई कर्मचाऱ्याकडून बाळंतिणीला इंजेक्शन
Follow us on

वाशिम : वाशिममध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला (Injection from cleaning staff) आहे. वाशिममध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात एक महिला सफाई कर्मचारी एका प्रसूती झालेल्या महिला रुग्णाला इंजेक्शन देत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे या रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची टीका होत आहे.

वाशिममध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात 25 जानेवारीला एका महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर सकाळी सफाई कर्मचारी महिला तिला इंजेक्शन देण्यासाठी आली. तेव्हा त्या महिलेने विरोध केला. पण त्या सफाई कर्मचारी महिलेने जबरदस्ती इंजेक्शन तिला दिलं. विशेष म्हणजे त्या सफाई कामगाराच्या बाजूला एक परिचारिका ही उभी होती. हा सर्व प्रकार एका नागरिकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर कारवाई अशी मागणी होत आहे.

यानंतर हा जीवघेणा प्रकार उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या कंत्राटी महिला कामगार यांना कामावरून काढलं आहे. तसेच या प्रसूती वार्डमध्ये जी परिचारिका काम करत होती. तिचीही चौकशी करु असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास सोनटक्के यांनी सांगितले आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रुग्णालय प्रशासन चौकशी करुन कारवाई करेल. मात्र रुग्णाच्या जीवाशी सुरु असणारा हा खेळ कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झाला (Injection from cleaning staff) आहे.