कोरोना संकटात अभिनेत्री जॅकलिनचा मदतीचा हात, नगरमधील दोन गावं दत्तक

| Updated on: Aug 18, 2020 | 11:44 PM

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि साकुर ही दोन गावं दत्तक घेतली आहेत (Jacqueline Fernandez adopts two villages of Ahmednagar district).

कोरोना संकटात अभिनेत्री जॅकलिनचा मदतीचा हात, नगरमधील दोन गावं दत्तक
Follow us on

अहमदनगर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि साकुर ही दोन गावं दत्तक घेतली आहेत (Jacqueline Fernandez adopts two villages of Ahmednagar district). जॅकलिनने तिच्या वाढदिवशी (11 ऑगस्ट) हा निर्णय घेतला. कोराना संकटादरम्यान खेडेगावांची परिस्थिती भयानक झाली आहे. त्यामुळे खेडेगावातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य कायम राहावं, खेडेगावतील कुणीही उपाशी राहू नये, या उद्देशाने जॅकलिनने हे सामाजिक पाऊल उचललं आहे.

जॅकलिन फर्नांडिसने पाथर्डी आणि साकुर गावातील प्रत्येकाला जेवण मिळावं यासाठी ‘अ‍ॅक्शन अगेंस्ट हंगर स्ट्राईक’ या संस्थेसोबत हातमिळवणी केली आहे. याआधीदेखील जॅकलिनने कुपोषणबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या संस्थेसोबत काम केलं आहे. त्यानंतर आता खेडेगावांमधील भूकबळी रोखण्यासाठी जॅकलिनने दोन गावांची जबाबदारी घेतली आहे.

जॅकलिनने पाथर्डी आणि साकुर गावांसाठी तीन वर्षांची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या तीन वर्षांपर्यंत 1 हजार 550 गावकऱ्यांना दररोज जेवण दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे तीन वर्षात या गावांमध्ये विविध कार्यशाळादेखील घेतल्या जाणार आहेत.

या योजनेअंतर्गत महिलांना बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचं संगोपन कसं करायचं, याबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर 6 वर्षांच्या मुलांचं कुपोषण संबंधित तपासणी केली जाणार आहे (Jacqueline Fernandez adopts two villages of Ahmednagar district).

या योजनेअंतर्गत गावात किचन गार्डन तयार केलं जाईल. गावातील काम सर्व संरक्षणसंबंधित नियमावलीचं पालन करुन सुरु आहे की नाही, याकडे बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. याशिवाय गावात उपासमारीने कुणाचाही मृत्यू होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर जेवणात सर्व पोषक आहार दिला जाणार आहे.

जॅकलिन फर्नांडिसनने सामाजिक बांधिलकी जपत सुरु केलेल्या या मोहिमेबाबत ‘अ‍ॅक्शन अगेंस्ट हंगर’ने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. “आपल्या सहकार्याबाबत जॅकलिन फर्नांडिस धन्यवाद, परिवारात आपलं स्वागत आहे. या कठीण प्रसंगी एकत्र मिळून काम करण्याची आणि अनेकांच्या जीवनात चांगला बदल घडवण्यासाठी मदतीचा हात देणं जरुरी आहे”, असं अ‍ॅक्शन अगेंस्ट हंगर या संस्थेनेने इन्स्टाग्रामवर म्हटलं आहे.

हेही वाचा : रिया आदित्य ठाकरेंना कधीही भेटली नाही, वकील सतीश मानशिंदेचा मोठा खुलासा