.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमुळे दारुची दुकान बंद, दारुअभावी नागपुरात एकाचा मृत्यू झाल्याचा दावा

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आलं असून सर्व दारुची दुकाने बंद (Liquor Close Nagpur Person died) आहेत.

लॉकडाऊनमुळे दारुची दुकान बंद, दारुअभावी नागपुरात एकाचा मृत्यू झाल्याचा दावा
| Updated on: Mar 31, 2020 | 6:32 PM
Share

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Liquor Close Nagpur Person died) संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आलं असून सर्व दारुची दुकाने बंद आहेत. यामुळे दारु मिळत नसल्याने अनेक तळीराम हताश झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून दारु न मिळाल्याने एका व्यक्तीची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला आहे. नागपुरात हे घटना घडली आहे.

नागपूरमधील एमआयडीसी भागात राहणाऱ्या वैभव मनोहर मोते (Liquor Close Nagpur Person died) असे या मृताचे नाव आहे. वैभव मोते यांना दारुचे प्रचंड व्यसन होते. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून शहरातील दारुची दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून त्यांना दारु मिळाली नाही. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती, असं म्हटलं जात आहे.

वैभव हे रविवारी (29 मार्च) रोजी त्यांच्या राहत्या घरी आजारी अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात भरती केले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

तर दुसरीकडे काल संचारबंदीमुळे दारु मिळत नसल्याच्या कारणातून यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीत हा धक्कादायक प्रकार घडला.  दारु मिळत नसल्याने हताश झालेल्या यंत्रमाग कामगाराने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागिरक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात आली (Liquor Close Nagpur Person died) आहे.

संबंधित बातम्या : 

संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

साताऱ्यातील मोदी पेढेवाल्यांना लॉकडाऊनचा फटका, कंदी पेढे रस्त्यावर फेकण्याची वेळ

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर