संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

केरळमध्येही दारुची दुकानं बंद असल्याने दारुच्या आहारी गेलेल्या पाच तळीरामांनी पाच दिवसात आत्महत्या केल्याच्या चिंताजनक घटना समोर आल्या होत्या. (Kolhapur Alcoholic Suicide during Lockdown)

संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

इचलकरंजी : संचारबंदीमुळे दारु मिळत नसल्याच्या कारणातून यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीत हा धक्कादायक प्रकार घडला. (Kolhapur Alcoholic Suicide during Lockdown)

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आलं असून सर्व दारुची दुकाने बंद आहेत. दारु मिळत नसल्याने हताश झालेल्या यंत्रमाग कामगाराने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

यंत्रमाग कामगाराच्या आत्महत्येनंतर नातेवाइकांनी आक्रोश केला. कोल्हापुरातील शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

केरळमध्येही दारुची दुकानं बंद असल्याने दारुच्या आहारी गेलेल्या पाच तळीरामांनी पाच दिवसात आत्महत्या केल्याच्या चिंताजनक घटना समोर आल्या होत्या.

हेही वाचा : संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी

दरम्यान, इचलकरंजी शहर आजपासून तीन दिवस 100 टक्के लॉकडॉकन करण्यात आलं आहे. त्यामुळे रस्ते ओस पडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत होती. त्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी हा निर्णय घेतला. (Kolhapur Alcoholic Suicide during Lockdown)

मेडिकलच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यावर पोलिसांनी कारवाईची बडगा उगारला. आता सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध विक्री होईल. तर मेडिकल आणि दवाखाने तसेच नगरपरिषदेची अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 वर पोहोचली आहे. तीन दिवसात तीन कोरोनाबाधित आढळल्याने आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्याहून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बहिणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आहे.

दरम्यान, सीपीआरमध्ये कोरोना कक्षात उपचार सुरु असताना वृद्धाचा मृत्यू झाला. मधुमेहामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना कक्षात आज नव्या 31 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. 13 संशयितांचे नमुने घेतले गेले. 32 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर आज 25 संशयित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 3 हजार 713 जणांची तपासणी करण्यात आली आहे.

(Kolhapur Alcoholic Suicide during Lockdown)

Published On - 4:08 pm, Mon, 30 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI