नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका, सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

| Updated on: Jan 01, 2020 | 4:49 PM

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरच्या दरात वाढ (LPG gas cylinder price hike) झाली आहे. वर्षाची सुरुवातच महागाईने झाल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका, सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ
Follow us on

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरच्या दरात वाढ (LPG gas cylinder price hike) झाली आहे. वर्षाची सुरुवातच महागाईने झाल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. LPG सिलेंडरच्या दरात 19 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरात आज (1 जानेवारी) विना सब्सिडीवाले 14 किलो आणि 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ (LPG gas cylinder price hike) झालेली आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत.

बाजारात सिलेंडरच्या किमतीत पाचव्यांदा वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात 611.50 रुपये सिलेंडरचे दर होते. तर आजपासून सिलेंडर 749 रुपयांना मिळणर आहे. या दरम्यान सिलेंडरच्या किमतीत 137 रुपये वाढ झाली आहे. तर व्यावसायिक वापर करणाऱ्या सिलेंडरच्या किमतीत 230 रुपयांची वाढ झाली आहे.

दिल्लीत विना सब्सिडीच्या 14 किलो म्हणजेच घरातील सिलेंडरच्या किमतीत 19 रुपयांची वाढ होऊन 714 रुपये किंमत झाली आहे. तर कोलकातामध्ये 21.50 रुपये वाढून 747 रुपये किंमत झाली आहे. मुंबईत 19.50 रुपये वाढून 684.50 रुपये किंमत झाली आहे. तर चेन्नईमध्ये 20 रुपये वाढून 714 रुपये सिलेंडरची किंमत झाली आहे.

विना सब्सिडीवाल्या 19 किलो म्हणजेच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत दिल्लीमध्ये 29.50 वाढून 1241 किंमत झाली आहे. कोलकातामध्ये 33 रुपये वाढून 1308.50 रुपये किंमत झाली आहे. मुंबईमध्ये 29.50 रुपये वाढून 1190 किंमत झाली असून चेन्नईमध्ये 30 रुपये वाढून 1363 किंमत झाली आहे.

दरम्यान, पाच किलोच्या छोट्या सिलेंडरवर सात रुपये वाढले आहेत. आता यासाठी 276 रुपये मोजावे लागणार आहे. यावेळी घरच्या सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात 238.10 रुपयांची सब्सिडी मिळणार आहे.