Lockdown : 450 किमी पायी चालत पोलीस कामावर हजर

| Updated on: Apr 01, 2020 | 1:17 PM

मध्य प्रेदशात एक पोलीस लॉकडाऊन दरम्यान सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने 450 किमी चालत कामावर (Madhya pradesh Police walked up to mp) हजर झाला.

Lockdown : 450 किमी पायी चालत पोलीस कामावर हजर
Follow us on

भोपाळ : मध्य प्रेदशात एक पोलीस लॉकडाऊन दरम्यान सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने 450 किमी चालत कामावर (Madhya pradesh Police walked up to mp) हजर झाला. त्याच्या या कामगिरीमुळे पोलीस स्टेशनमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला आहे. दिग्विजय शर्मा असं या बहादूर पोलिसाचं नाव (Madhya pradesh Police walked up to mp) आहे.

दिग्विजय 16 मार्च रोजी एका परीक्षेसाठी आपल्या गावी इटावा (उत्तर प्रदेश) येथे गेला होता. या दरम्यान 25 मार्च रोजी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यासोबत सर्व परीक्षाही रद्द केल्या. तसेच दिग्विजय 24 मार्चपर्यंत सुट्टीवर होता. लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. अशा परिस्थितीत दिग्विजय चालत मध्य प्रदेशातील राजगड पोलीस स्टेशन पोहोचला.

“मी 24 मार्च रोजी इटावावरुन निघालो होतो आणि 28 मार्च रोजी मी माझ्या कामावर पोहोचलो. मी जवळपास 450 किमी चालत आलो. येताना रस्त्यात गरजेचे वस्तूही मिळाल्या”, असं दिग्विजयने सांगितले.

“दिग्विजय आपल्या कामासाठी थेट चालत आला. याचा इतरांनी आदर्श घेतला पाहिजे. पोलिसांमध्येही दिग्विजयच्या या कामगिरीमुळे उत्साह निर्माण झाला आहे. तसेच दिग्विजयचा आम्ही सत्कारही केला आहे”, असं पोलीस अधिक्षक प्रदीम शर्मा यांनी सांगितले.