AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Live | मुंबईसह महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस, हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, कोकणात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी

मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी (Maharashtra Mumbai Rain Live Update) लावली. कोकणात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Live | मुंबईसह महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस, हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, कोकणात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी
| Updated on: Jul 04, 2020 | 6:39 PM
Share

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी (Maharashtra Mumbai Rain Live Update) लावली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. लोअर परेल, दादर, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, मुलुंड, भांडुप या ठिकाणी संततधार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले.

मुंबईसह नवी मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस 

मुंबईत मुसळधार पावसामुळे हिंदमाता, मिलन सबवे, किंग्ज सर्कल, कुर्ला, एस.व्ही. रोड या भागात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबईत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

त्याशिवाय ठाणे, वसई, विरार, मिरा भाईंदर परिसरात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

पुण्यात रिमझिम पाऊस 

पुणे शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. मात्र येत्या काही दिवसात पुणे आणि जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – Maharashtra Rainfall | बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?

कोकण किनारपट्टीवर 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला (Maharashtra Mumbai Rain Live Update) आहे.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. कणकवलीतील जाणवली आणि गडनदी या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे. तसेच कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिजचे काम सुरु आहे. त्याच्या शेजारीच सर्व्हिस रोडच्या संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. तर कुडाळ मधील मुंबई-गोवा महामार्गावरील भंगसाळ नदीलाही पूर आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

तसेच कुडाळ-माणगाव येथील आंबेरी पुलावर देखील पावसाचे पाणी साचले. यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला. कोकणात सर्वच जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चंद्रपुरात दमदार पाऊस, बळीराजा सुखावला

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लावली. चंद्रपुरातील सर्व गावात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.

जुलैच्या सुरुवातीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबीन पिकाला यामुळे उभारी मिळणार असून कापूस आणि धान पिकांसाठी हा पाऊस नवसंजीवनी ठरणार आहे.

जळगावातील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले 

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 6 दरवाजे सकाळी अर्धा मीटरने उघडण्यात आले. जळगावसह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. तर नदी परिसरात पाऊस सुरुच असल्याने पाण्याची आवकही वाढत आहे.

त्यामुळे हतनूर प्रशासनाने धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. धरणातून 6 दरवाजातून 5086 क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी खळखळून वाहत (Maharashtra Mumbai Rain Live Update) आहे.

वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू

वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला, बारा वर्षीय मुलगा आणि त्याचे आजोबा वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यातील एक घटना सोनेगाव (आष्टी) येथे शुक्रवारी (3 जुलै) रात्री उघडकीस आली. तर, दुसरी घटना गोजी येथे शनिवारी (4 जुलै) सकाळी उघडकीस आली.

संबंधित बातम्या : 

Mumbai Rains Live | मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा

Wardha Rain | वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू, 12 वर्षीय नातू आणि आजोबाही बुडाले

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या