शेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही

| Updated on: Apr 01, 2020 | 6:22 PM

दुधाचा एकही थेंब शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी दिली आहे.

शेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही
Follow us on

वर्धा : राज्यात कोरोणा विषाणूंचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे त्याचा फटका दुग्ध व्यवसायालाही बसत आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे पूर्ण दूध संकलित केले जाईल. दुधाचा एकही थेंब शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी दिली आहे. सुनील केदार आज वर्धा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी वर्ध्यात शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली (Minister Sunil Kedar).

“शेतकऱ्यांचा दुधाचा व्यवसाय विस्कळीत झाला आहे. हा व्यवसाय सुरळीत करण्यासाठी शासनाने पुढाकार घेत शिल्लक दुधाचे दूध पावडर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकरी आणि शेतमजूर तसेच विस्थापित मजुरांना प्राधान्य देऊन कुणीही उपाशी राहणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे”, असं सुनील केदार म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीत अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला धान्य पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. या कठीण प्रसंगात शेतकरीही अडचणीत आहे. धान्य पिकवणारा एकही शेतकरी, शेतमजूर उपाशी राहणार नाही, याची जबाबदारी प्रशासन घेत आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना धान्य दिलं जाणार आहे. मात्र, इतर जिल्ह्यातील अडकलेल्या कामगारांकडे रेशन कार्ड नाही. या सर्वांना 2014 च्या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत धान्य दिल जावं, अशी मागणी वर्ध्यातील सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

राज्य सरकार दररोज 10 लाख लिटर दुधाची खरेदी करणार

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज 10 लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील”, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल (31 मार्च) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

संबंधित बातमी : शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात दररोज 10 लाख लिटर दुधाची खरेदी करणार