शिर्डीत मनसे नगरसेवकाचं अपहरण, हॉटेलवर जेवताना पळवलं

मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं अपहरण करण्यात आलं. रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करत असताना, त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

शिर्डीत मनसे नगरसेवकाचं अपहरण, हॉटेलवर जेवताना पळवलं
| Edited By: | Updated on: Jun 25, 2019 | 12:32 PM

शिर्डी (अहमदनगर) :  शिर्डी पालिकेतील नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला उत आला आहे. नगरसेवकांची पळवा-पळवी आणि लपवा-छपवी सुरु झाली आहे. मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं अपहरण करण्यात आलं. रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करत असताना, त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

शिर्डी नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर अपहरणाच्या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र काही वेळापूर्वीच अपहरण झालेले नगरसेवक दत्तात्रय कोते हे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले. स्वतःहून ते लोणी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

नेमकं अपहरण का झाले, ते कोणी केले ? याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. मात्र सरपंच निवडणुकीपासून नगराध्यक्ष, महापौर किंवा तत्सम निवडणुकांमध्ये नगरसेवक किंवा सदस्यांची पळवापळवी झाल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळेही ही घटनाही त्याचप्रकारची म्हणावी लागेल.