AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Drugs Case : नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंचं ‘सत्यमेव जयते’ !

पत्रकार परिषद घेत मलिक यांनी फ्लेचर पटेल आणि 'लेडी डॉन' या दोन व्यक्तींचा उल्लेख करत, वानखेडे यांना सवाल केले आहेत. मलिकांच्या या आरोपांबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना विचारलं. त्यावेळी वानखेडे यांनी अवघ्या पाच शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai Drugs Case : नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंचं 'सत्यमेव जयते' !
नवाब मलिक, समीर वानखेडे
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 6:27 PM
Share

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल आणि ‘लेडी डॉन’ या दोन व्यक्तींचा उल्लेख करत, वानखेडे यांना सवाल केले आहेत. मलिकांच्या या आरोपांबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना विचारलं. त्यावेळी वानखेडे यांनी अवघ्या पाच शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे. (Sameer Wankhede’s reply to Nawab Malik’s question about Fletcher Patel and Lady Don)

फ्लेचर पटेल आणि यास्मिन वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंना सवाल केले आहेत. समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असे सवाल मलिक यांनी केले आहेत. त्याबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना गाठलं आणि त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिलीय. त्यांनी याबाबत जास्त बोलणं टाळलं असल्याचं पाहायला मिळालं.

नवाब मलिकांचे प्रश्न काय?

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर आणखी एक तोफ डागली. फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांचे फोटोही मी ट्विटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असं मलिक म्हणाले.

तीन केसेसमध्ये एकच पंच कसा?

सीआरपीसी कायद्यात एकच पंच वारंवार घेतला जात असेल तर केसेसमध्ये दम नसतो अनेकदा हे कोर्टाने सांगितलं आहे. या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे रॅकेट काय आहे? लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

‘लेडी डॉन’च्या हस्तक्षेपावरुन एनसीबीला घेरण्याचा प्रयत्न

मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एका लेडी डॉनच्या हस्तक्षेपावरून एनसीबीला घेरले. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले.

इतर बातम्या : 

Mumbai Drugs Case : नवाब मलिकांचा फ्लेचर पटेलांचा उल्लेख, आता पटेलांचं प्रत्युत्तर काय?

Mumbai Drugs Case : ‘पुरावे द्या, मग बोला’, यास्मिन वानखेडे यांचं नवाब मलिकांना आव्हान

Sameer Wankhede’s reply to Nawab Malik’s question about Fletcher Patel and Lady Don

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.