Mumbai Drugs Case : नवाब मलिकांचा फ्लेचर पटेलांचा उल्लेख, आता पटेलांचं प्रत्युत्तर काय?

एनसीबी आणि समीर वानखेडे हे खूप मोठं आणि चांगलं काम करत आहेत. म्हणून सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून वानखेडे यांनी एनसीबीला मदत करत असतो. देशात ड्रग्स आणून तरुण पिढीला ड्रग्स अॅडिक्ट केलं जात आहे. ते रोखण्याचं काम एनसीबी करत आहे. म्हणून मी त्यांना मदत करत आहे', असं फ्लेचर पटेल यांनी म्हटलंय.

Mumbai Drugs Case : नवाब मलिकांचा फ्लेचर पटेलांचा उल्लेख, आता पटेलांचं प्रत्युत्तर काय?
फ्लेचर पटेल, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 2:21 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स प्रकरणात आता एनसीबी अधिकारी समीन वानखेडे यांच्यावर अजून एक आरोप केलाय. यावेळी मलिक यांच्याकडून फ्लेचर पटेल यांचं नाव समोर आणलं आहे. समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असा सवाल मलिकांनी केलाय. आता प्लेचर पटेल यांनीच मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. (Fletcher Patel responds to Nawab Malik’s allegations against Sameer Wankhede)

‘मी एक माजी सैनिक आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे हे खूप मोठं आणि चांगलं काम करत आहेत. म्हणून सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून वानखेडे यांनी एनसीबीला मदत करत असतो. देशात ड्रग्स आणून तरुण पिढीला ड्रग्स अॅडिक्ट केलं जात आहे. ते रोखण्याचं काम एनसीबी करत आहे. म्हणून मी त्यांना मदत करत आहे’, असं फ्लेचर पटेल यांनी म्हटलंय.

‘कुणाला घाबरत नाही, मी देशासाठी काम करत राहणार’

समीर वानखेडे यांना फक्त मीच नाही तर पूर्ण देश ओळखतो. फोटोमध्ये लेडी डॉन म्हणून आहेत. त्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. म्हणून आदराने त्यांना लेडी डॉन असं मी म्हणतो. त्यांनी कोविड काळात महत्वाचं काम केलंय. त्या समीर वानखेडेंच्या थोरल्या बहीण अॅड. यास्मिन वानखेडे आहेत. समीर वानखेडे, एनसीबीची दहळत गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. मी कुणाला घाबरत नाही. मी देशासाठी काम करत राहणार, असंही फ्लेचर पटेल यांनी म्हटलंय.

नवाब मलिकांचा आरोप काय?

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर आणखी एक तोफ डागली. फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांचे फोटोही मी ट्विटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असं मलिक म्हणाले.

तीन केसेसमध्ये एकच पंच कसा?

सीआरपीसी कायद्यात एकच पंच वारंवार घेतला जात असेल तर केसेसमध्ये दम नसतो अनेकदा हे कोर्टाने सांगितलं आहे. या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे रॅकेट काय आहे? लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

इतर बातम्या :

ती लेडी डॉन कोण?, बॉलिवूड आणि तुमच्याशी कनेक्शन काय?; नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

‘बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, नितेश राणेंना उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Fletcher Patel responds to Nawab Malik’s allegations against Sameer Wankhede

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.