Mumbai Drugs Case : ‘पुरावे द्या, मग बोला’, यास्मिन वानखेडे यांचं नवाब मलिकांना आव्हान

माझ्या राजकीय स्टेटसचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला, असं आव्हान यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिकांना दिलंय.

Mumbai Drugs Case : 'पुरावे द्या, मग बोला', यास्मिन वानखेडे यांचं नवाब मलिकांना आव्हान
नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 3:25 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीय. फ्लेचर पटेलसोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय? तिचं बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी केले आहेत. मलिकांच्या या प्रश्नांना आता समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलंय. (Yasmin Wankhede’s reply to Nawab Malik’s allegations)

कॅबिनेत मंत्री असं अनव्हेरिफाईट स्टेटमेंट देत आहेत. काही स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपटच सेनेत उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय स्टेटसचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला, असं आव्हान यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिकांना दिलंय.

‘..तर मानहानीचा दावा दाखल करणार’

कुणाला बदनाम करण्याचं काम आम्ही करत नाही. आमचे नातेवाईक जर येत नसतील तर आमची चूक आहे का? जे कर्मठ आहेत. जे चांगलं काम करत आहेत. त्यांना बदनाम करु नका, असंही यास्मिन वानखेडे म्हणाल्या. इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी भविष्यात असे आरोप केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार, कायदेशीर नोटीस पाठवणार असा इशाराही त्यांनी दिलाय.

लेडी डॉनच्या हस्तक्षेपावरून मलिकांनी एनसीबीला घेरले

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एका लेडी डॉनच्या हस्तक्षेपावरून एनसीबीला घेरले. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले.

फ्लेचर पटेल यांचं मलिकांना प्रत्युत्तर

दरम्यान, मलिक यांनी फ्लेचर पटेल यांचंही नाव घेतलं होतं. त्यानंतर पटेल यांनी मलिकांच्या दाव्याला अत्तर दिलं आहे. ‘मी एक माजी सैनिक आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे हे खूप मोठं आणि चांगलं काम करत आहेत. म्हणून सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून वानखेडे यांनी एनसीबीला मदत करत असतो. देशात ड्रग्स आणून तरुण पिढीला ड्रग्स अॅडिक्ट केलं जात आहे. ते रोखण्याचं काम एनसीबी करत आहे. म्हणून मी त्यांना मदत करत आहे’, असं फ्लेचर पटेल यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

Mumbai Drugs Case : नवाब मलिकांचा फ्लेचर पटेलांचा उल्लेख, आता पटेलांचं प्रत्युत्तर काय?

ती लेडी डॉन कोण?, बॉलिवूड आणि तुमच्याशी कनेक्शन काय?; नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

Yasmin Wankhede’s reply to Nawab Malik’s allegations

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.