
मुंबई मेट्रो 3 चे 80 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता इतर कामांना गती येणार आहे. वर्षा अखेरीपर्यंत मुंबई मेट्रोचा आणखी एक मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

कुलाबा ते सीप्झ असा मेट्रो 3 चा मार्ग असणार आहे. मेट्रो 3 च्या भुयारी मेट्रो स्टेशनला थेट तुमच्या घरातून आणि ऑफिसमधून प्रवेश मिळेल.

मेट्रो 3 च्या 26 प्रस्तावित स्थानकांपैकी 13 स्थानकांचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मेट्रो 3 साठी एकूण 32 भुयारे केली जाणार आहेत.

मेट्रो 3 प्रकल्प हा 30 हजार कोटी खर्चाचा आहे. देशातील ही पहिली भुयारी मेट्रो आहे.

मेट्रो 3 मुळे दक्षिण मुंबई ही थेट उत्तर मुंबईला जोडली जाणार आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.