नाशिकला जाणारा कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार

| Updated on: Aug 06, 2019 | 11:47 AM

मुंबई-नाशिक कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार आहे. मुंबई-नाशिकच्या जुन्या महामार्गावर रस्ता खचल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

नाशिकला जाणारा कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार
Follow us on

नाशिक : मुंबई-नाशिक कसारा (Mumbai-Nashik) घाट मार्ग 1 महिना बंद राहणार आहे. मुंबई-नाशिकच्या जुन्या महामार्गावर रस्ता खचल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. बंदच्या काळामध्ये या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. हा मार्ग बंद केल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे नाशिकमधील कसारा घाटातील रस्त्यावर दोन भाग पडले आहेत. त्यामुळे त्या मार्गावरुन वाहतूक करणे धोक्याचे ठरु शकते. सध्या नाशिक परिसरात पावासाने कहर केला आहे.

गेले काहीदिवस नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर गेले दोन दिवस मुसळधार पावासाने नाशिकचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी अनेकांच्या घरातही शिरलं आहे. नाशिकमधील पूरग्रस्त परिस्थिती सध्या आटोक्यात आली असून पाऊस मात्र सुरु आहे.

राज्यातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या शहरांमध्ये नाशिकमधील त्रम्बकेश्वरच्या नावाचाही समावेश होतो. अजूनही नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमिवर शाळा, कॉलेज आणि खासगी कंपन्यांना बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कसारा घाटातील रस्ता खचल्याने नव्या मार्गावरुन सर्व वाहतूक चालवण्यात येणार आहे.