AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kangana ranaut | संगीतकार वाजिदच्या निधनानंतर पत्नीचे सासरवर गंभीर आरोप, कंगनाचा पंतप्रधानांना प्रश्न

संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाला पाच महिने उलटल्यानंतर त्याची पत्नी कमलरुखने सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा तिने केला.

kangana ranaut | संगीतकार वाजिदच्या निधनानंतर पत्नीचे सासरवर गंभीर आरोप, कंगनाचा पंतप्रधानांना प्रश्न
| Updated on: Nov 29, 2020 | 7:56 PM
Share

मुंबई : संगीतकार वाजिद खान (wajid khan)यांच्या निधनाला पाच महिने उलटल्यानंतर त्याची पत्नी कमलरुखने सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा तिने केला. या प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतने (kangana ranaut) उडी घेत थेट पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.(musician Wajid khan, his wife made serious allegations against his father-in-law, Kangana questioned the Prime Minister)

कोरोनाचा इतर क्षेत्राप्रमाणे बॉलिवूडमध्येही वाईट परिणाम झाला. याकाळात अनेक निर्माते व दिग्दर्शकांचे नुकसान झाले. तर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला. यामध्ये साजिद-वाजिद या प्रसिद्ध जोडीतील वाजिदचे 1 जून 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या 5 महिन्यांनंतर त्याची पत्नी कमलरुख यांनी त्यांच्या सासरच्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. कमलरुखचा आरोप आहे की, त्यांचे सासरे त्यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत आहेत. आता याप्रकरणात कंगना रनौतने ट्‌विट करत यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. कंगनाने ट्‌वीटमध्ये म्हटले आहे की, मला पंतप्रधान कार्यालयाला विचारायचे आहे, अल्पसंख्याक समाज जे कुठलीही सहानुभूती मिळवणारी नाटकं, शिरच्छेद, दंगली, धर्मांतर करत नाहीत, त्यांचे आपण रक्षण कसे करत आहात? पारसी समाजाची संख्या धक्कादायक पद्धतीने घटत चालली आहे.

प्रख्यात संगीतकारद्वयी साजिद-वाजिद यांच्यापैकी वाजिद खान यांचे मुंबईत अकस्मात निधन झाले होते. मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे उद्भवणार्‍या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. ते अवघ्या 42 वर्षांचे होते. दबंग सिरीज, पार्टनर, वॉन्टेड, एक था टायगर, टायगर जिंदा है, गर्व, मुझसे शादी करोगे अशा चित्रपटांतील एकापेक्षा एक गाजलेली गाणी साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केली होती.

वाजिद खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत होती. तबलावादक उस्ताद शराफत अली खान यांचे दोन पुत्र साजिद-वाजिद यांनी अल्पकाळात मनोरंजन विश्वात नाव कमावले होते. 1998 मध्ये साजिद-वाजिद यांनी सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटाला संगीत देऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर चोरी चोरी, हॅलो ब्रदर, मुझसे शादी करोगी, पार्टनर, वॉन्टेड आणि दबंग अशा सुपरस्टार सलमानच्या चित्रपटांसाठी त्यांनी अनेक अल्बम बनवले. सलमानच्या ‘भाई भाई’ गाण्याला दिलेली धून वाजिद यांची अखेरची प्रसिद्ध गीतमाला ठरली.

गायक म्हणून वाजिद खान यांनी 2008 मध्ये पार्टनरसाठी पहिले गाणे गायले. “हुड हुड दबंग”, “जलवा”, “चिंता ता चिता चिता” आणि “फेव्हीकॉल से” यासारखे ट्रॅक त्यांनी लोकप्रिय केले.

संबंधित बातम्या : 

Kangana Ranuat | ‘तुम्हाला निलंबित केले पाहिजे’, कंगना रनौत महिला आयपीएस अधिकाऱ्यावर संतापली!

कंगना रनौत हाजीर हो! मुंबई पोलिसांकडून कंगनासह रंगोलीला तिसऱ्यांदा समन्स

(musician Wajid khan, his wife made serious allegations against his father-in-law, Kangana questioned the Prime Minister)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ