AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साजिद-वाजिद संगीतकारद्वयीतील वाजिद खान यांचे निधन

दबंग, पार्टनर, वॉन्टेड, एक था टायगर, मुझसे शादी करोगे अशा चित्रपटांतील गाजलेली गाणी साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केली आहेत. (Music Composer Wajid Khan of famous duo Sajid-Wajid passed away)

साजिद-वाजिद संगीतकारद्वयीतील वाजिद खान यांचे निधन
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 01, 2020 | 8:13 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील प्रख्यात संगीतकारद्वयी साजिद-वाजिद यांच्यापैकी वाजिद खान यांचे मुंबईत अकस्मात निधन झाले. मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे उद्भवणार्‍या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. ते अवघ्या 42 वर्षांचे होते. (Music Composer Wajid Khan of famous duo Sajid-Wajid passed away) दबंग सिरीज, पार्टनर, वॉन्टेड, एक था टायगर, टायगर जिंदा है, गर्व, मुझसे शादी करोगे अशा चित्रपटांतील एकापेक्षा एक गाजलेली गाणी साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केली आहेत.

वाजिद खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. गेले चार दिवस ते चेंबुरमधील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

तबलावादक उस्ताद शराफत अली खान यांचे दोन पुत्र साजिद-वाजिद यांनी अल्पकाळात मनोरंजन विश्वात नाव कमावले. 1998 मध्ये साजिद-वाजिद यांनी सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटाला संगीत देऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर चोरी चोरी, हॅलो ब्रदर, मुझसे शादी करोगी, पार्टनर, वॉन्टेड आणि दबंग अशा सुपरस्टार सलमानच्या चित्रपटांसाठी त्यांनी अनेक अल्बम बनवले. सलमानच्या ‘भाई भाई’ गाण्याला दिलेली धून वाजिद यांची अखेरची प्रसिद्ध गीतमाला ठरली.

गायक म्हणून वाजिद खान यांनी 2008 मध्ये पार्टनरसाठी पहिले गाणे गायले. “हुड हुड दबंग”, “जलवा”, “चिंता ता चिता चिता” आणि “फेव्हीकॉल से” यासारखे ट्रॅक त्यांनी लोकप्रिय केले.

संगीतकार सलीम मर्चंट यांनी वाजिद खान यांच्या निधनाने मोठा धक्का बसल्याच्या भावना ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.

(Music Composer Wajid Khan of famous duo Sajid-Wajid passed away)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेही वाजिद खान यांच्या खळाळत्या हास्याची आठवण जागवली.

हेही वाचा : मनोरंजन विश्व पुन्हा रुळावर; चित्रपट-मालिकांच्या शूटिंगला सशर्त मान्यता

(Music Composer Wajid Khan of famous duo Sajid-Wajid passed away)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...