Unlock 1 | मनोरंजन विश्व पुन्हा रुळावर; चित्रपट-मालिकांच्या शूटिंगला सशर्त मान्यता

निर्मात्यांना यानुसार आता निर्मितीपूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येतील. (Film TV Serials Shooting to begin again during Corona Lockdown 5)

Unlock 1 | मनोरंजन विश्व पुन्हा रुळावर; चित्रपट-मालिकांच्या शूटिंगला सशर्त मान्यता
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 7:53 PM

मुंबई : चित्रपट, टीव्ही मालिका, ओटीटी मालिका अर्थात वेब सीरीज यांच्या चित्रीकरणाला काही अटी व शर्थींसह मान्यता देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने आज यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला. (Film TV Serials Shooting to begin again during Corona Lockdown 5)

मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनचे पदाधिकारी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती. 19 मार्चपासून म्हणजे जवळपास गेले अडीच महिने चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे.

निर्मात्यांना यानुसार आता निर्मितीपूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येतील. निर्मात्यांनी काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे आहे. नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे. कोविडसंदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सूचना यासाठी लागू राहतील.

हेही वाचा : महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

मुंबईत चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना “व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव” येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.

केंद्र सरकारनंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. याबाबत नियमावली जाहीर करताना कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?

  • 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक
  • कंटेनमेंट झोन वगळता जनजीवन सुरु होणार
  • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम अशा सगळ्यांना परवानगी
  • सार्वजनिक मैदानेही खुली होणार
  • समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी
  • धार्मिक स्थळं बंदच राहणार (Film TV Serials Shooting to begin again during Corona Lockdown 5)
  • स्टेडिअम मात्र बंदच राहणार
  • फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश
  • लांबच्या प्रवासावर बंदी
  • शाळा, कॉलेज महाविद्यालये बंदच राहणार
  • मेट्रो बंदच राहणार
  • आंतरराज्य प्रवासाला परवानगी नाही

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु?

महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती, मात्र या 9 गोष्टींवरील बंदी कायम

सायकलिंग, रनिंग, वॉकिंगला परवानगी, लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु काय बंद?

(Film TV Serials Shooting to begin again during Corona Lockdown 5)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.