Lockdown 5.0 | सायकलिंग, रनिंग, वॉकिंगला परवानगी, लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु काय बंद?

सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि सार्वजनिक कार्यक्रमाची स्थळं हेही बंद असतील.

Lockdown 5.0 | सायकलिंग, रनिंग, वॉकिंगला परवानगी, लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु काय बंद?
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 6:20 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पाचव्यांदा लॉकडाऊनचा (Lockdown 5.0 Maharashtra Guidelines) कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन चारचा कालावधी आज संपतो आहे. तर उद्यापासून म्हणजेच 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे. याबाबत केंद्राने काल नियमावली जाहीर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली (Lockdown 5.0 Maharashtra Guidelines) आहे.

राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक देण्यात आली आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता इतर परिसरात जनजीवन सुरु करण्यात येणार आहे. राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, धार्मिक स्थळं आणि प्रार्थना स्थळं नागरिकांसाठी बंदच राहणार आहेत. राज्यात तीन टप्प्यांमध्ये हे सर्व घडणार आहे.

लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

  • कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात जनजीवन सुरुळीत होणार
  • सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी
  • सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा
  • सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी
  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे
  • गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत
  • सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील
  • मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील
  • खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारीवर्गसह उघडू शकतात

Lockdown 5.0 Maharashtra Guidelines

लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय बंद?

  • शाळा, महाविद्यालयं, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्था राज्यभरात बंद राहतील.
  • गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या वाहतुकी व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद असेल.
  • मेट्रो रेल्वे बंद राहतील
  • प्रवाशांना विमानाने अथवा रेल्वेने प्रवासास बंदी असेल. विशेष परिस्थितीत नियमांचं पालन करुन दिलेली परवानगी असेल तर त्यांना परवानगी दिली जाईल.
  • सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि सार्वजनिक कार्यक्रमाची स्थळं हेही बंद असतील.
  • माजिक, राजकीय, खेळविषयक, मनोरंजन, विद्यापीठीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना/सभांना बंदी असेल.
  • धार्मिक स्थळं आणि प्रार्थना स्थळं नागरिकांसाठी बंद असतील.
  • केशकर्तनालये, सौदर्य प्रसाधने (ब्युटी पार्लर), स्पा, सलून बंद असतील.
  • शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि इतर सेवा बंद राहतील.

कुठल्या टप्प्यात कशाला परवानगी

पहिला टप्पा – येत्या 3 जूनपासून पहिला टप्पा सुरु होईल. यात सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा, केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही

सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी

सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते,

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत

सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.

दुसरा टप्पा – येत्या 5 जूनपासून दुसरा टप्पा सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.

१. ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही २. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी ३. जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा

टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2 दुचाकी – केवळ चालक

तिसरा टप्पा – येत्या 8 जून पासून तिसरा टप्पा सुरु होईल. या टप्प्यात खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात. इतरांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहित करावे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

  • पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल
  • दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे
  • तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे
  • चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे
  • पाचवा लॉकडाऊन – 1 जून ते 30 जून

Lockdown 5.0 Maharashtra Guidelines

संबंधित बातम्या :

Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु?

Maharashtra Lockdown Guideline | महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

Lockdown 5.0 | लॉकडाऊन 5 मध्ये या 10 गोष्टी पाळाव्याच लागणार!

Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.