AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरातील शाळांकडून पालकांना फी भरण्यास; पुस्तक खरेदीसाठी सक्ती, पालकांकडून आंदोलनाचा इशारा

काही नामांकित शाळेकडून पालकांना शाळेची फी भरण्यासाठी मॅसेज येत आहेत. तसेच पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली (Nagpur School Forced to Pay Fees) जात आहे.

नागपुरातील शाळांकडून पालकांना फी भरण्यास; पुस्तक खरेदीसाठी सक्ती, पालकांकडून आंदोलनाचा इशारा
| Updated on: Jun 02, 2020 | 12:08 PM
Share

नागपूर : राज्यात कोरोनाचं संकट असताना कोणत्याही शाळेने पालकांकडून फी मागू (Nagpur School Forced to Pay Fees) नये. तसेच फीसाठी कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र तरीही नागपुरातील काही नामांकित शाळेकडून पालकांना शाळेची फी भरण्यासाठी मॅसेज येत आहेत. तसेच पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भूमिकेला पालकांनी विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय शालेय शिक्षण विभागाने पत्र काढून शाळांनी कुठल्याही पालकाकडून शैक्षणिक शुल्कासह इतर शुल्क घेऊ नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. या निर्देशाविरोधात जाणाऱ्या शाळा किंवा शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटलं आहे.

मात्र सरकारच्या या पत्राला न जुमानता काही शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्याचे संदेश पाठविण्यास सुरू केले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

काही सीबीएसई शाळांकडून पुस्तक आणि स्टेशनरी खरेदी करण्यासाठी पालकांना संदेश पाठवले जात आहे. मात्र काही जागरुक पालक परिषदेनं शाळांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. तसेच शाळांनी फी आणि पुस्तकांसाठी आग्रह केल्यास आंदोलनाचा इशाराही पालकांनी दिला (Nagpur School Forced to Pay Fees) आहे.

संबंधित बातम्या : 

पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शासन निर्णय जारी, अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार

फेलोशिप मंजूर करा, अन्यथा रस्त्यावर उतरु, विद्यार्थ्यांचा धनंजय मुंडेंना अल्टिमेटम

गुणांची सरासरी काढून निकाल, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा

Follow Us
डायर नाही, कायर पाहिला! लाठीचार्जवर देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा!
Ritesh-Genelia Deshmukh | युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला, तेल भडकल, भारतावर संकट.

इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला, तेल भडकल, भारतावर संकट

क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका.

क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका

पोलिसांनी पहिला हल्ला केला; एका विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक; अभिजीत दीपकेंच्या गंभीर आरोपाने खळबळ.

पोलिसांनी पहिला हल्ला केला; एका विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक; अभिजीत दीपकेंच्या गंभीर आरोपाने खळबळ

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला

Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप.

Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप