नवी मुंबईत ‘मिशन बिगीन अगेन’, 33 कंटेन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन – अभिजीत बांगर

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 33 कंटेन्मेंट झोन वगळून इतर भागातील लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

नवी मुंबईत 'मिशन बिगीन अगेन', 33 कंटेन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन - अभिजीत बांगर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 33 कंटेन्मेंट झोन वगळून इतर भागातील (Navi Mumbai Lockdown In Containment Zone) लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार, 31 ऑगस्ट 2020 पासून ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु होईल. शहरात 33 कंटेन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू राहील (Navi Mumbai Lockdown In Containment Zone).

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील कंटेन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन लागू ठेवण्याचा आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘कोव्हिड-19’चा प्रसार थांबविण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनची गरज आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन राहील. हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने 31ऑगस्ट रोजी जाहीर केल्याप्रमाणे ‘मिशन बिगीन अगेन’चा आदेश दिला आहे.

नवी मुंबईतील नागरिकांसाठी पालिकेच्या सूचना

  • घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक राहील.
  • सार्वजनिक ठिकाणी 2 व्यक्तींमध्ये किमान 2 फुटाचे अंतर असावे. दुकानदारांनी ग्राहक सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे (Navi Mumbai Lockdown In Containment Zone).
  • सार्वजनिक आणि खाजगी समारंभात 20 ते 50 जणांचा समावेश असावा.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे केल्यास दंड आकारण्यात येईल.
  • सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास सक्त मनाई आहे.
  • नागरिकांनी जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम पद्धतीचे पालन करावे.
  • कामाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटाईजरची व्यवस्था प्रवेशद्वार आणि बाहेर पडणाऱ्या मार्गावर तसेच इतर आवश्यक ठिकाणी उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी.
  • कार्यालयातील कामकाजाची ठिकाणे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावी.
  • कामाच्या ठिकाणी तसेच जेवणाच्या सुट्टीमध्ये दोन कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टनसिंग राहील याची दक्षता घ्यावी.

Navi Mumbai Lockdown In Containment Zone

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील दुकानदारांना दिलासा, दुकानं दररोज उघडण्यास आयुक्तांची परवानगी

Published On - 11:39 pm, Tue, 1 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI