नवी मुंबईतील दुकानदारांना दिलासा, दुकानं दररोज उघडण्यास आयुक्तांची परवानगी

नवी मुंबईतील दुकानदारांना दिलासा, दुकानं दररोज उघडण्यास आयुक्तांची परवानगी
Beed Shops

एक दिवसाआड सुरु असलेली दुकानं कायमची खुली करण्यात आली आहेत.

Nupur Chilkulwar

|

Aug 18, 2020 | 8:19 PM

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबईतही दुकानं दररोज सुरु राहणार आहेत (Navi Mumbai Shops Will Open). एक दिवसाआड सुरु असलेली दुकानं कायमची खुली करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या या शहरातील दुकानदारांना दिलासा मिळाला असून नवी मुंबई आता पुन्हा सुरु होणार आहे (Navi Mumbai Shops Will Open).

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांची भेट घेत सरसकट दुकाने खुली करण्याची मागणी केली होती. आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने खुली करण्याची परवानगी आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

गणेशोत्सवासारखा सण जवळ असल्याने व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची संधी आहे. आधीच चार महिने दुकानं बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व दुकाने सुरु करण्याची मागणी आम्ही लावून धरली होती. ती आता उशिरा का होईना मान्य झाली आहे आणि दुकाने सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं

मॉल मात्र बंदच

अनेक व्यापाऱ्यांना याबाबत माहिती न मिळाल्याने काही दुकाने बंदच असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. मात्र, दोन्ही दिशेची दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी शहरातील मॉल आणि तेथील दुकानांना मात्र परवानगी अजून दिलेली नाही.

Navi Mumbai Shops Will Open

संबंधित बातम्या :

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची अचानक बदली, डॉ. संजय मुखर्जी यांची वर्णी

नवी मुंबईत ‘सिडको’ विकास अधिकाऱ्याला काळे फासल्याचे प्रकरण, सहा पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें