Corona : उत्तरप्रदेशात नवजात बालकाचे नाव ‘लॉकडाऊन’

कोरोना विषाणू रोखण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित (new born baby name lockdown) केला.

Corona : उत्तरप्रदेशात नवजात बालकाचे नाव लॉकडाऊन
| Edited By: | Updated on: Apr 01, 2020 | 10:25 AM

नवी दिल्ली : कोरोना विषाणू रोखण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित (new born baby name lockdown) केला. 25 मार्चपासून हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. आज (1 मार्च) लॉकडाऊनचा आठवा दिवस आहे. या लॉकडाऊन दरम्यान उत्तरप्रदेशमधील देवरीयामध्ये एका महिलेने बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाच्या आई-वडिलांनी त्याचे नाव ‘लॉकडाऊन’ ठेवले आहे. लॉकडाऊन नाव ठेवल्यामुळे सध्या या बाळाची जोरदार चर्चा (new born baby name lockdown) सर्वत्र सुरु आहे.

देवरीयाच्या खुखुंदू गावात राहणाऱ्या पवन कुमारची पत्नी नीरजा गरोदर होती. 28 मार्च रोजी गावातील सामुदायिक स्वास्थ्य केंद्रावर नीरजाने बाळाला जन्म दिला. ज्यावेळी बाळाचा जन्म झाला तेव्हा लॉकडाऊनचा चौथा दिवस होता. बाळाचा जन्म झाला त्याचदिवशी त्याने नाव लॉकडाऊन ठेवण्यात आले.

“आम्ही बाळाचे नाव लॉकडाऊन ठेवले तेव्हा लोकांनी मस्करी केली. पण नंतर कौतुकही केले”, असं बाळाच्या आईने सांगितले.

“पंतप्रधना मोदी यांनी या विषाणू विरोधात लढत आहेत. या लढ्यात सहभागी होण्यासाठी आम्ही आमच्या मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवले आहे. जेणेकरुन लोक यातून काहीतरी शिकतील आणि या लढ्यात यशस्वी होतील”, असं बाळाच्या वडिलांनी सांगितले.

दरम्यान, डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा लोकसभेत नागरिकता बिल पास झाले होते. त्यानंतर देशातील निर्वासीतांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रत्येक ठिकाणी हे बिल पास झाल्यानंतर सर्वत्र आनंद साजरा केला जात होता. याच दरम्यान एका निर्वासीत व्यक्तीच्या पत्नीने मुलीला जन्म दिला तिचे नाव ‘नागरिकता’ ठेवण्यात आले होते.