‘निर्भया’च्या मारेकऱ्यांची फाशी अटळ, एकामागून एक चौघे लटकणार

22 जानेवारीला सकाळी सात वाजता तिहार तुरुंगातील जेल नंबर 3 मध्ये निर्भयाचे चारही मारेकरी फासावर लटकवले जातील.

'निर्भया'च्या मारेकऱ्यांची फाशी अटळ, एकामागून एक चौघे लटकणार

नवी दिल्ली : ‘निर्भया’वर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्मांची फाशी आता अटळ आहे. विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी केलेली क्युरेटिव्ह (फेरविचार) याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली (Nirbhaya convicts Curative petitions) आहे. त्यामुळे 22 जानेवारीला सकाळी सात वाजता निर्भयाचे चारही मारेकरी फासावर लटकवले जातील.

सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन्ही दोषींची फेरविचार याचिका फेटाळून लावली. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने गेल्याच आठवड्यात दोषी अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) यांचं डेथ वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 22 जानेवारीच्या सकाळी एकाच वेळी फाशी दिली जाईल.

जेल नंबर तीनमध्ये चौघाही दोषींना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील जल्लाद चौघांना एकामागून एक फासावर लटकवेल. या कुटुंबात पिढ्यान् पिढ्या हेच काम केले जाते. मात्र निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवणारी व्यक्ती पहिल्यांदाच जल्लाद म्हणून काम करणार आहे.

पोटात 10 कोटींचे ड्रग्ज लपवले, 10 डझन केळी खायला देऊन ड्रग्ज कॅप्सूल बाहेर

निर्भया बलात्कार घटनेच्या 2 हजार 578 दिवसांनंतर डेथ वॉरंट जारी करण्यात आलं होतं. 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भया सामूहिक बलात्काराला बळी पडली होती. या पाशवी अत्याचारांनंतर निर्भयाची प्रकृती बिघडत गेली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

तिहार प्रशासन सज्ज

तिहार तुरुंगात चौघांच्या फाशीची तयारी पूर्ण झाली आहे. दोषींच्या डमींना रविवारी फाशी देऊन रंगीत तालीम करण्यात आली होती. प्रत्येक दोषीच्या वजनाइतकी दगड-मातीने भरलेली पोती फासावर लटकवून तयारी करण्यात आली. पोत्याला गळफास लावून दोरीची क्षमता तपासण्यात आली. जल्लादाला न बोलावता तुरुंगातील अधिकाऱ्यांनीच फाशीची प्रक्रिया (Nirbhaya convicts Curative petitions) पूर्ण केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI