अधिसूचना जारी, 20 रुपयांचं नाणे लवकरच चलनात!

नवी दिल्ली: येत्या काही दिवसात 20 रुपयांचं नाणे चलनात येणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी याबाबतची घोषणा केली. अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. सध्या चलनात 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांचं नाणे आहे. आता यामध्ये 20 रुपयांच्या नाण्याची भर पडणार आहे. नवं 20 रुपयांचं नाणे 27 एमएम आकाराचं […]

अधिसूचना जारी, 20 रुपयांचं नाणे लवकरच चलनात!
रिझर्व्ह बँक
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली: येत्या काही दिवसात 20 रुपयांचं नाणे चलनात येणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी याबाबतची घोषणा केली. अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. सध्या चलनात 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांचं नाणे आहे. आता यामध्ये 20 रुपयांच्या नाण्याची भर पडणार आहे.

नवं 20 रुपयांचं नाणे 27 एमएम आकाराचं असेल. या नाण्याची बाहेरील बाजूची रिंग 65 टक्के कॉपर, 15 टक्के जिंक आणि 20 टक्के निकेल धातूची असेल. तर आतील बाजू 75 टक्के कॉपर, 20 टक्के जिंक आणि 5 टक्के निकेल असेल.

रंजक बाब म्हणजे दहा वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने मार्च 2009 मध्ये 10 रुपयांचं नाणे जारी केलं होतं.  तेव्हापासून 13 वेळा त्याच्या डिजाईनमध्ये बदल करण्यात आला. सततच्या बदलत्या डिजाईनमुळे जनतेमध्येही या 10 रुपयाच्या नाण्याबाबत संभ्रम होता. काही दुकानदार तर 10 रुपयाचं नाणे स्वीकारत नसल्याच्या तक्रारी होत्या.

चलनी नोटांच्या तुलनेत नाणी टिकाऊ असल्याने जास्तीत जास्त नाणी चलनात आणण्याचा मानस रिझर्व्ह बँकेचा आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें