गाडीच्या टायरची देखभाल आता मोबाईलवरुनही करा

| Updated on: Aug 13, 2019 | 10:46 PM

डिजिटल युगात आज सगळ्या गोष्टी स्मार्ट झाल्या आहेत. बऱ्याच गोष्टी आपण आपल्या मोबाईलवरुन करु शकतो. स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट लाईट्स, स्मार्ट होम, स्मार्ट कार आणि आता स्मार्ट टायरही बाजारात आले आहेत.

गाडीच्या टायरची देखभाल आता मोबाईलवरुनही करा
Follow us on

मुंबई : डिजिटल युगात आज सगळ्या गोष्टी स्मार्ट झाल्या आहेत. बऱ्याच गोष्टी आपण आपल्या मोबाईलवरुन करु शकतो. स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट लाईट्स, स्मार्ट होम, स्मार्ट कार आणि आता स्मार्ट टायरही बाजारात आले आहेत. JK टायर कंपनीने असा टायर तयार केला आहे की, जो टायर तुमच्या गाडीच्या सर्व टायर्सवर लक्ष ठेवू शकतो. त्या टायरमध्ये कंपनीने एक सेन्सर जोडलेले आहे.

प्रत्येक गाडीसाठी त्या गाडीचे टायर ठिक असणे महत्त्वाचे असते. कारण टायरमध्ये जर गडबड असेल तर त्याचा फटका गाडीच्या कामगिरीवर बसतो. बऱ्याचदा लोक टायरवर लक्ष देत नाहीत. खराब टायरचा वापर करतात, एअर प्रेशर ठिक ठेवत नाही. त्यामुळे JK टायर एक नवीन सेंसर घेऊन आला आहे. जो टायरची काळजी घेण्यात तुमची मदत करेल.

जे के टायरने ट्रिल सेन्सरच्या मदतीने दबाव निगराणी प्रणाली (TPMS) सादर केली आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलवरही टायर पाहू शकतात. तसेच तुम्ही यामाध्यमातून टायरचे तापमानही पाहू शकतात. या प्रणालीद्वारे तुम्ही टायर संबधित प्रत्येक गोष्टीची माहिती जाणून घेऊ शकता. टायरमध्ये किती हवा याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. कंपनीनुसार ट्रिल सेन्सर देशात 700 डीलर्सकडे उपलब्ध आहे.