अमेरिकेत No Entry! तब्बल 39 देशांवर बंदी, जग हादरलं, थेट नोकऱ्यांसह…
वॉशिंग्टन, डी.सी. येथे गोळीबार झाल्याने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अमेरिकेकडून मोठी पाऊले उचलण्यात आली असून थेट काही देशांवर कारवाई करत प्रवासबंदी करण्यात आली आहे. 15 देशांचा आता प्रवासबंदी यादीत समावेश करण्यात आला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेवर बोट ठेवत काही मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे अनेक देशांच्या नागरिकांना अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही. स्थलांतर धोरण आणखी कठोर केले गेले. 15 देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर आंशिक निर्बंध लादण्यात आले. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेद्वारे प्रवेश निर्बंध लादलेल्या देशांची एकूण थेट 39 वर पोहोचली. 1 जानेवारी 2026 पासून अमेरिकेचे नवीन नियम लागू केले जातील. प्रशासनाचे म्हणणे आहे की, कमकुवत व्हिसा तपासणी प्रणाली, व्हिसा मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य आणि दहशतवादी कारवायांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे काही देशांच्या नागरिकांना थेट अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.
अमेरिकेने केलेल्या घोषणेनुसार, बार्बुडा, बेनिन, अंगोला, अँटिग्वा, कोट दिव्ह्वा, गॅबॉन, गांबिया, मलावी, डॉमिनिका, गॅबॉन, गांबिया, झिम्बाब्वे ,मॉरिटानिया, नायजेरिया, सेनेगल, टांझानिया, टोंगा, झांबिया या देशांच्या नागरिकांवर अंशतः प्रवेश निर्बंध लादण्यात आले आहेत. बुरुंडी, क्युबा, व्हेनेझुएला आणि टोगोच्या नागरिकांवरील सध्याचे आंशिक निर्बंध कायम राहतील. नवीन प्रणालीनुसार, फक्त तुर्कमेनिस्तान या देशाला आंशिक दिलासा देण्यात आला आहे. बाकी सर्व देशांवरील निर्बंध तशीच आहेत.
26 नोव्हेंबर रोजी वॉशिंग्टन, डी.सी. येथे गोळीबार झाला होता आणि नॅशनल गार्डचे दोन सैनिक मारले गेले. हा हल्ला एका अफगाणिस्तान नागरिकाने केला होता, जो मागील काही दिवसांपासून अमेरिकेत राहत होता. खास व्हिसा कार्यक्रमातून तो अमेरिकेत आला होता. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर अमेरिकेत त्याला आश्रय देण्यात आला होता. हा व्हिसा कार्यक्रम खास अशा लोकांसाठी होता, ज्यांनी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्याची मदत केली.
अनेक देशांमधील सक्रिय दहशतवादी धोके, संघर्ष आणि व्हिसा मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य करण्याचे प्रमाण ही मुख्य कारणे आहेत. बुर्किना फासो, माली आणि नायजेरिया हे देश महत्त्वपूर्ण दहशतवादी कारवाया असलेले देश म्हणून ओळखले गेले आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत.
