प्रेयसीची ओढ, उस्मानाबादवरुन नगरमार्गे बाईकने पाकिस्तानला, सीमेवर BSF ने पकडलं

| Updated on: Jul 17, 2020 | 5:44 PM

उस्मानाबाद जिल्ह्यातील 20 वर्षाचा तरुण प्रेयसीच्या ओढीने उस्मानाबादवरुन नगरमार्गे बाईकने पाकिस्तानला निघाला होता (Osmanabad boy love with Pakistani Girl).

प्रेयसीची ओढ, उस्मानाबादवरुन नगरमार्गे बाईकने पाकिस्तानला, सीमेवर BSF ने पकडलं
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील 20 वर्षाचा तरुण प्रेयसीच्या ओढीने उस्मानाबादवरुन नगरमार्गे बाईकने पाकिस्तानला निघाला होता (Osmanabad boy love with Pakistani Girl). बाईकवरुन गुजरातपर्यंत पोहोचल्यानंतर, त्याला BSF जवानांनी भारत-पाक सीमेवर पकडले. झिशान सिद्दीकी असं या तरुणाचे नाव (Osmanabad boy love with Pakistani Girl) आहे.

झिशानची सोशल मीडियावरुन पाकिस्तानी तरुणीसोबत ओळख झाली होती. दररोजच्या चॅटिंगमधून दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. प्रेमात वेडा झालेल्या झिशानला कोरोनाचे काय, भारत-पाकिस्तान सीमांचेही भान राहीले नाही.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

प्रेमात वेडा झालेला झिशान मोटारसायकल घेऊन अहमदनगरमार्गे गुजरातच्या कच्छ भागात पोहोचला. तिथे त्याची मोटारसायकल बंद पडल्याने तो पायी चालत पाकिस्तानला निघाला होता. तिथे भारतीय सीमा ओलांडण्याच्या तयारीत असताना त्याला बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतलं आहे.

झिशान पाकिस्तानला निघाला याबाबत त्याच्या घरच्यांना काहीच माहित नव्हते. त्याच्या कुटुंबियांनी झिशान हरवल्याची तक्रार दाखल केली होती. बीएसएफ जवानांनी उस्मानाबाद पोलिसांना फोन केला आणि झिशानची लव्ह स्टोरी सांगितली. यानंतर झिशानला घ्यायला उस्मानाबाद पोलिसांची टिम कच्छला रवाना झाली आहे.

झिशान पाकिस्तानला जात असल्याचे एकून त्याच्या कुटुंबियांनाही धक्काच बसला आहे.

संबंधित बातम्या :

उस्मानाबादेत राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा, तर परभणीत वीज बिलाविरोधात भाजपचेही निदर्शने

Osmanabad Corona Death | उस्मानाबादमध्ये ऑक्सिजनअभावी तरुणाचा मृत्यू