पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली, डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली, डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. पाकिस्तान राहणारे सर्वसामान्य नागरिक दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने हैराण झाले आहे. यानंतर आता पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली असून, एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 149 वर पोहोचले आहे. येत्या काही दिवसात पाकिस्तानी रुपया आणखी खाली जाण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

सध्या पाकिस्तान आर्थिक डबघाईला आलं आहे. पाकिस्तान राहणाऱ्या अनेक लोकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दैनंदिन वापरच्या वस्तूंचे दरही पाकिस्तानात गगनाला भिडले आहे. पाकिस्तानात महागाईचा दर 9.41 टक्क्यांवर पोहोचला आहे.

या कारणामुळे पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात 29 टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 149 वर पोहोचले आहे. दरम्यान नेपाळमध्ये मात्र रुपयाचे मूल्य वधारले असून, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 112 वर पोहोचले आहे. त्याशिवाय एका डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाचे मूल्य 70.23 वर पोहोचले आहे. त्यापाठोपाठ अफगाणिस्तान 79.2, नेपाळ 112, श्रीलंका 176.18 अशी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आहे.

पाकिस्तानी रुपया घटल्याची काही संभाव्य कारणं

पाकिस्तान भारताप्रमाणे खनिज तेल आयात करते. त्याशिवाय पाकिस्तानात दैनंदिन वापरातील वस्तूही आयात केल्या जातात. यामुळे रुपयाचं मूल्य सातत्यानं कमी होत असून महागाईत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आईएमएफ)ने बेलआऊट डील केल्यानंतर पाकिस्तानी रुपयात ऐतिहासिक घसरण झाली आहे. पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील करारातील अटी, शर्ती अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदार संभ्रमाव्यस्थेत आहेत. अनेकांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका पाकिस्तानी अर्थव्यस्थेला बसला आहे. पाकिस्तानी रुपयाचे मूल्य सध्या 149 वर पोहोचले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात 29 टक्क्याने घट झाली आहे.

प्रसारमाध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून येत्या अर्थसंकल्पात वीज आणि गॅसच्या किमती वाढवणार आहेत. त्यामुळे आधीच महागाईने कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांचे आणखी हाल होणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI