नाशिकजवळ भीषण अपघात, खासदाराचा मुलगा जखमी, डॉक्टरचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर टायर फुटल्यामुळे नियंत्रण सुटून कार नाल्यात कोसळली. या अपघातात गाडीमधील डॉक्टरचा मृत्यू झाला, तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित जखमी झाले आहेत.

नाशिकजवळ भीषण अपघात, खासदाराचा मुलगा जखमी, डॉक्टरचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 24, 2019 | 9:07 AM

पालघर/नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळ टायर फुटून कार नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात (Nashik Car Accident) नाशिकच्या डॉक्टरचा मृत्यू झाला, तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित (Shivsena MP Rajendra Gavit) यांच्या मुलासह दोघं जण जखमी आहेत.

डॉ. संजय पोपटराव शिंदे, डॉ. जतिन संखे आणि शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित नाशिकहून पालघरमधील मोखाड्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात टायर फुटल्यामुळे डॉ. शिंदे यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ती कठडा तोडून थेट नाल्यात कोसळली.

अपघातात शिंदे यांना गंभीर मार लागला होता. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अपघात स्थळी धाव घेऊन त्यांना कारमधून बाहेर काढलं. नाशिककडे जाणारी खाजगी वाहनं थांबण्यास तयार नव्हती. त्याचवेळी गर्भवतीला प्रसुतीसाठी त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणारी 108 रुग्णवाहिका तिथून जात होती.

शिंदेंना रुग्णवाहिकेत टाकून प्रथमोपचार करण्यात आले. प्राणवायू सपोर्ट देऊन रुग्णवाहिकेच्या पायलट चालकाने वाऱ्याच्या वेगाने रुग्णवाहिका नाशिकच्या दिशेने नेली. मात्र जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचली, तेव्हा डॉक्टरांनी शिंदेंना मृत घोषित केलं.

45 वर्षीय डॉ. संजय पोपटराव शिंदे नाशकातील कामटवाडा सिडको परिसरात राहत होते. या अपघातामध्ये जखमी झालेल्या डॉ. जतीन संखे आणि रोहित गावित यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोण आहेत राजेंद्र गावित?

काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित हे मूळचे नंदुरबारचे आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते. पालघरमधील शिवसेनेचे माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी गावित भाजपात सहभागी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि वनगा यांच्या पुत्राचा पराभव केला.

त्यानंतर 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गावित भाजपमधून शिवसेनेत आले. सेना-भाजप युतीमध्ये लढत असली, तरी राजेंद्र गावितांनी शिवबंधन बांधून निवडणूक लढवली. शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या पालघर मतदारसंघात ते विजयी होऊन खासदारपदी निवडून आले.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.