….म्हणून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत : विनायक मेटे

| Updated on: Oct 24, 2020 | 1:18 PM

पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत असा विश्वास शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायम मेटे यांनी व्यक्त केला आहे.

....म्हणून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत : विनायक मेटे
Follow us on

औरंगाबाद : एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर पंकजा मुंडेदेखील पक्ष सोडतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशात पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत असा विश्वास शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायम मेटे यांनी व्यक्त केला आहे. (Pankaja Munde will not leave BJP said by vinayak Mete) खरंतर खडसेंप्रमाणे, पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

पण यावर पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, ‘पंकजा मुंडे या त्यांच्या प्रदेश अध्यक्षांना कितीही वाईट बोलल्या. धिक्कार केला, काहीही बोलल्या, त्यांच्या कार्यक्रमाला नाही गेल्या. वाईट कमेंट केल्या, तरी हे सगळं फक्त भाजप सहन करतो. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जातील असं मला वाटत नाही.’ असं विधान विनायक मेटे यांनी केलं आहे.

‘प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का?’

तर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेशा देण्यात शरद पवार बिझी असल्यामुळे त्यांना मराठा आरक्षणकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल असं म्हणत विनायक मेटे यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका
मराठा आरक्षण प्रकरणी आघाडी सरकारने समाजाला सैरभैर केलं आहे. बैठकीत सरळ-सरळ चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण प्रकरणी काही घडलं तर त्याला फक्त अशोक चव्हाण जबाबदार असतील. अशोक चव्हाण हे फक्त खुर्ची उबवण्याचं काम करत आहेत, अशी गंभीर टीकाही यावेळी मेटेंनी केली.

रात गयी, बात गयी, खडसेंबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची कमेंट

(Pankaja Munde will not leave BJP said by vinayak Mete)