नीट परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता, पंतप्रधानांची तज्ज्ञांसोबत बैठक

एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा देखील लवकरच घेतली जाऊ शकते जेणेकरून अधिकाधिक आरोग्य कर्मचारी कोविड -19 ड्युटीवरवर तैनात करता येतील. (PM Narendra Modi's meeting with experts likely to postpone exams)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:53 PM, 2 May 2021
नीट परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता, पंतप्रधानांची तज्ज्ञांसोबत बैठक
नीट परीक्षा

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. दरम्यान, यासंदर्भात आज पंतप्रधानांनी आरोग्य तज्ज्ञांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. बैठकीत पीएम मोदी नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एएनआयच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट(NEET) पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याशिवाय कोविड ड्युटीमध्ये एमबीबीएस आणि नर्सिंग अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना तैनात करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा देखील लवकरच घेतली जाऊ शकते जेणेकरून अधिकाधिक आरोग्य कर्मचारी कोविड -19 ड्युटीवरवर तैनात करता येतील. कोविड ड्युटीमध्ये तैनात करण्यासाठी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरकार प्रोत्साहनपर पैसेही देऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समजते. (PM Narendra Modi’s meeting with experts likely to postpone NEET exams)

‘पेन अँड पेपर मोड’ अंतर्गत हिंदी आणि इंग्रजीसह 11 भाषांमध्ये होणार परीक्षा

NEET 2021 पेन अँड पेपर मोडमध्ये आणि वर्षामध्ये फक्त एकदा आयोजित केले जाईल. पदवीधर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांचे वय 17 ते 25 वर्षामध्ये असणे आवश्यक आहे आणि बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. नवीन वैद्यकीय शिक्षण धोरणांतर्गत विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत ‘पेन अँड पेपर मोड’ अंतर्गत हिंदी आणि इंग्रजीसह 11 भाषांमध्ये नीट परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा देशभरातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि बीडीएसमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते.

1 ऑगस्ट रोजी परीक्षेचे आयोजन

नवीन वैद्यकीय शिक्षण धोरणांतर्गत विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा रविवारी 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. एनईईटी (ग्रॅज्युएट) 2021 एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येते.

गतवर्षी 90 टक्के विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

मागील वर्षी या परीक्षेसाठी एकूण 15.97 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. कोरोना महामारी असूनही 13 सप्टेंबर रोजी 14.37 लाखाहून अधिक उमेदवार प्रवेश परीक्षेस बसले होते. कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती, त्यांच्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे निकालाला थोडा उशीर झाला. (PM Narendra Modi’s meeting with experts likely to postpone NEET exams)

इतर बातम्या

जी सीट बापानं तीनदा जिंकली, ती पोराला का जिंकता आली नाही? भगीरथ भालकेंच्या पराभवाची 5 कारणं; वाचा सविस्तर

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं, पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक