नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं, पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा", अशी मागणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi).

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं, पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं : नवाब मलिक
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 4:56 PM

गोंदिया : “देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शाह यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हात आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे अमित शाह आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi).

‘मोदी-शाह यांनी बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर उत्तर द्यावं’

“भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अबकी बार 200 आकडे पार असे बोलून फेकाफेकीचे राजकारण केलं. आता निवडणुकीच्या निकालाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, असं नवाब मलिक म्हणाले (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi).

नवाब मलिक यांचा गोंदिया दौरा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी 10 वाजता ग्रामीण कोविड रुग्णालय सडक अर्जुनीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान क्रीडा संकुल गोंदिया आणि केटीएस सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनंतर दीड वाजता खरीप हंगामाबाबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली.

पश्चिम बंगालमध्ये नेमकं कोण विजयी ?

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेस सध्या 209 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 81 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बंगालमधील नंदीग्राम या मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली होती. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक होती. कारण या मतदारसंघातून भाजपकडून तेथील विद्यमान आमदार शुभेंदू अधिकारी यांनी निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातील निवडणूक शेवटपर्यंत अटीतटीची राहिली. अखेर ममता बॅनर्जी 3727 मतांनी विजयी झाल्या. दुसरीकडे या निवडणुकीत बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांना प्रचंड कमी जागा मिळताना दिसत आहेत. बंगालमध्ये काँग्रेस दोन तर इतर एका जागेवर आघाडीवर आहेत.

हेही वाचा : नंंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या, अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.