West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालावर मनसेप्रमुख राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले….

मला प्रादेशिक ओळख आणि अस्मितेची जाण आहे. | Raj Thackeray Mamta Banerjee

West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालावर मनसेप्रमुख राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले....
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 4:12 PM

मुंबई: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. मला प्रादेशिक ओळख आणि अस्मितेची जाण आहे. तुम्हालाही याची जाणीव असेल. आगामी काळात तृणमूल काँग्रेस हा पश्चिम बंगालचा सर्वसमावेशक विकास करेल, अशी आशा राज ठाकरे यांनी व्यक केली. (MNS Chief Raj Thackeray on West Bengal Election Results 2021)

सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातील नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. काहीवेळापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फोनवरुन ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन ममता यांचे अभिनंदन केले. या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

West Bengal Election Results 2021 LIVE: नंदीग्राम मतदारसंघात चुरशीची लढत; ममता बॅनर्जी अवघ्या 6 मतांनी पिछाडीवर

जखमी वाघीण नेटाने लढली, बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल : संजय राऊत

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक (est Bengal election results 2021) मोठ्या धामधुमीत पार पडल्यानंतर आता येथील निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळवून भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. ममतांच्या या विजयानंतर आता देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा ममतांच्या (Mamata Banerjee) विजयामुळे देशातील राजकारण बदलू शकते असे सूचक वक्तव्य केले आहे.

“एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल,” असे संजय राऊत म्हणाले. पश्चिम बंगालसह इतर चार राज्यांच्या विधनासभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

संबंधित बातम्या:

West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

लाश वही है, बस कफन बदल गया है, बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटलांचं भाष्य

West Bengal Election Results 2021: बंगालमध्ये भाजपला झटका म्हणजे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार?; वाचा सविस्तर

(MNS Chief Raj Thackeray on West Bengal Election Results 2021)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.