पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून तिरंगा फडकवला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

बस्तर, छत्तीसगड : स्वातंत्र्य दिन असो, किंवा प्रजासत्ताक दिन. नक्षलवाद्यांच्या कुरापती या दिवशीही सुरुच असतात. पण छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या इंद्रावती नदीच्या तटावर जाऊन ध्वजारोहण केलं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलिसांनी नक्षलवाद्यांना कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाची सहा महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या नदीवर पूल बांधण्याची मागणी होती. त्यामुळे इथे […]

पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून तिरंगा फडकवला
Follow us on

बस्तर, छत्तीसगड : स्वातंत्र्य दिन असो, किंवा प्रजासत्ताक दिन. नक्षलवाद्यांच्या कुरापती या दिवशीही सुरुच असतात. पण छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या इंद्रावती नदीच्या तटावर जाऊन ध्वजारोहण केलं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलिसांनी नक्षलवाद्यांना कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.

पोलिसांच्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाची सहा महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या नदीवर पूल बांधण्याची मागणी होती. त्यामुळे इथे ध्वजारोहण करण्यात आलं आणि इथे फक्त पोलीस आणि जनतेचं राज्य चालणार असल्याचा संदेशही नक्षलवाद्यांना देण्यात आला.

या भागात नक्षलवाद्यांकडून काळे झेंडे फडकवले जायचे, असं बोललं जातं. इथे एक पूल बनवला जावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये इथे नेहमीच चकमकी होतात. पण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून ध्वजारोहण केलं आणि सामान्य जनतेच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.