ओपनएआयचा ChatGPT होणार अधिक बोल्ड, कारण Adult Mode लाँच होताच मिळणार ‘या’ खास सुविधा
ओपनएआयचा चॅटजीपीटी ॲडल्ट मोड 2026 च्या सुरुवातीला लाँच होऊ शकतो. हे फीचर फक्त व्हेरिफाय्ड ॲडल्ट आणि पेड युजर्ससाठी उपलब्ध असेल. हा फिचर लॉंच झाल्यावर कोणत्या सुविधांचा लाभ घेता येईल ते जाणून घेऊयात.

OpenAI च्या AI टूल, ChatGPT साठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, OpenAI 2026 मध्ये ChatGPT चा Adult Mode लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या मोडमुळे प्रौढ वापरकर्त्यांना अधिक स्पष्ट आणि NSFW (not safe for work)use casesवापरण्याची परवानगी मिळू शकते, ज्यामध्ये कामुक रोलप्ले सुद्धा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी कंपनीने स्पष्ट केले आहे की हे खास फिचर केवळ एक मजबूत ऐज व्हेरिफिकेशन प्रणाली अस्तित्वात आल्यानंतरच उपलब्ध होईल.
चॅटजीपीटी ॲडल्ट मोड 2026 मध्ये लाँच होऊ शकतो
द व्हर्जमधील एका वृत्तानुसार ओपनएआय ॲप्लिकेशन्सचे सीईओ फिदजी सिमो यांनी सांगितले की चॅटजीपीटीचा ॲडल्ट मोड 2026 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होऊ शकतो. हे ग्रोक सारख्या एआय प्लॅटफॉर्मच्या रेंजमध्ये सामील होईल, जे वापरकर्त्यांना NSFW कंटेट पाहण्याची परवानगी देते. मात्र ओपनएआय या फिचर्सबद्दल खूप सावधगिरी बाळगत आहे आणि मजबूत सुरक्षा उपायांशिवाय ते लाँच करणार नाही.
Age Verification प्रणाली ही सर्वात मोठी अट
ओपनएआयने स्पष्ट केले आहे की वापरकर्ता कायदेशीररित्या प्रौढ असल्याची पूर्णपणे पुष्टी झाल्यानंतरच ॲडल्ट मोड उपलब्ध होईल. हे करण्यासाठी कंपनी पारंपारिक opt-in सिस्टमची जागा घेण्यासाठी AI-powered age verification प्रणाली विकसित करत आहे. ही सिस्टम ॲप ॲक्टिव्हिटी आणि इतर सिग्नलच्या आधारे वापरकर्त्याच्या वयाचा अंदाज लावता येणार आहे. ही टेक्निक सध्या सुरुवातीच्या चाचणी टप्प्यात आहे.
कोणत्या देशांमध्ये ही चाचणी घेतली जात आहे आणि कोणाला प्रवेश मिळेल?
अहवालानुसार, या Age Verification प्रणालीची चाचणी काही निवडक देशांमध्ये केली जात आहे, जिथे ती प्रौढ वापरकर्त्य असल्याचे भासवून लॉग इन करणाऱ्याला ओळखते. जर ही चाचणी यशस्वी झाली, तर चॅटजीपीटी ॲडल्ट मोड प्रथम अमेरिकेत सुरू होण्याची शक्यता आहे. हे फिचर फक्त जे शुल्क भरणार आहे त्या सदस्यांसाठी उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे, मोफत वापरकर्त्यांसाठी नाही.
Erotic Roleplay आणि GPT-4o वाद
ऑक्टोबरमध्ये ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की कंपनी व्हेरिफाइड ॲडल्ससाठी नवीन एक्सक्लूसिव्ह फिचर्सवर काम करत आहे, ज्यामध्ये अधिक कामुक आणिflirtatious करणारे संभाषणे समाविष्ट असू शकतात. GPT-5 सादर केल्यानंतर GPT-4o मॉडेल काढून टाकल्याबद्दल वापरकर्त्यांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आले. अनेक वापरकर्त्यांना असे वाटले की GPT-4o अधिक कन्वर्सेशन आणि ह्यूमन-लाइक आहे. परंतु हे काढून टाकल्याने ChatGPT चा अनुभव कमी झाला.
