‘लक्ष्मी निवास’मधल्या ‘त्या’ भूमिकेवर चिडले नेटकरी; म्हणाले ‘आधी तिला काढून टाका’
आता जेव्हा सिद्धू जेलमधून बाहेर येईल तेव्हा काय होईल, विश्वाच्या साखरपुड्यात भावना, सिद्धू आणि जान्हवी, विश्वा आमनेसामने येतील का, या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'लक्ष्मी निवास' ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

अक्षया देवधरImage Credit source: Instagram
- झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत सध्या सिद्धू, भावना, जान्हवी, विश्वा आणि जयंत यांच्यातील नाट्यमय संघर्ष उंचावलं आहे. ही मालिका प्रेक्षकांना दररोज नवनवीन ट्विस्ट्स आणि भावनिक वळणांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे.
- सध्या मालिकेत सिद्धूला जेलमधून बाहेर काढण्यासाठी भावनाचे प्रयत्न सुरु आहेत. भावना सिद्धूला जेलमध्ये भेटते आणि ठाम शब्दात सांगते की, “ती काहीही करून सिद्धूला बाहेर काढेल.” परंतु या सगळ्यात सिद्धूला जेलमध्ये मारहाण होते, ज्यामुळे भावना अत्यंत तणावात आहे.
- भावना घरच्या लोकांसमोर विनंती करते की सिद्धूला बाहेर काढण्यासाठी जे करता येईल ते ती करेल. आता सिद्धूला सोडवण्यासाठी भावनाला एक कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. त्या परीक्षेत भावना जिंकूनसुद्धा हरणार आहे.
- कारण सिद्धूला बाहेर काढण्यासाठी तिला सिद्धूशी कायमचं दूर जावं लागणार आहे. तिच्या समोर घटस्फोटाचे कागदपत्र ठेवले जातात. तर दुसरीकडे सई जयंतच्या डब्यातून चिठ्ठी पाठवते, पण ते जेवण जेवून जयंतला जान्हवीच्या हातच्या जेवणाची आठवण येते.
- जयंत विश्वाला शोधत असताना दोघांमध्ये एका गैरसमजातून वाद होतो. विश्वा आणि सईचा साखरपुडा आहे म्हणून दिग्विजय पत्रिका द्यायला लक्ष्मीकडे आला आहे. मालिकेचा हा नवीन प्रोमो येताच नेटकऱ्यांनी एका भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘आधी त्या म्हातारीला काढून टाका’ असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.





