AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Jewellery Import: परदेशातून किती आणू शकतो सोन्याचे दागिने? नवीन सीमाशुल्क नियम काय?

Gold Jewellery Import: भारतात येणार्‍या प्रवाशांसाठी सीमाशुल्क नियमात सरकारने मोठा बदल केला आहे. नवीन नियमातंर्गत आता प्रवाशी महागड्या वस्तू आणू शकतील. त्याचा फायदा परदेशातून सोन्याचे दागिने, वैयक्तिक सामान आणणाऱ्या परदेशी भारतीयांना आणि पर्यटकांना होईल.

Gold Jewellery Import: परदेशातून किती आणू शकतो सोन्याचे दागिने? नवीन सीमाशुल्क नियम काय?
किती आणू शकतो दागिनेImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 03, 2026 | 1:49 PM
Share

New Customs Rules For Gold Jewellery: भारतात येणार्‍या प्रवाशांसाठी सरकारने मोठा बदल केला आहे. नवीन नियमातंर्गत आता प्रवाशी पहिल्यापेक्षा अधिक किंमतीच्या वस्तू शुल्कमुक्त आणू शकतात. त्याचा फायदा सोन्याचे दागिने, वैयक्तिक सामान, साहित्याच्या खरेदीसाठी होईल. पर्यटक आणि परदेशी प्रवाशांना त्याचा फायदा होईल. Baggage Rules 2026 हा 2 फेब्रुवारी 2026 पासून लागू झाले आहेत. नवीन बॅगेस नियम परदेशातील भारतीय प्रवाशांना दिलासा देणारे ठरले आहेत. आता त्यांना छोटे-मोठे गिफ्ट, ज्वेलरी आणि वैयक्तिक सामानावर सीमा शुल्क देण्याची चिंता नसेल. काय झाला तो मोठा बदल?

आता आणता येईल 75000 रुपयांचे सामान

नवीन नियमांनुसार, भारतीय नागरीक, भारतीय वंशाचे मूळ नागरीक आणि परदेशी भारतीय आणि व्हिसा असणारे परदेशी नागरीक आता 75,000 रुपयांपर्यंतचे सामान विना सीमा शुल्क अदा करता आणू शकतील. पूर्वी ही मर्यादा 50,000 रुपये इतकी होती. ही सवलत हवाई आणि जहाजाद्वारे येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल.

परदेशी पर्यटकांसाठी वेगळी मर्यादा

सरकारने परदेशी पर्यटकांसाठी वेगळा नियम लागू केला आहे. भारतीय वंशाचे नसलेल्या वा मुळचे भारतीय नसलेल्या परदेशी पर्यटकांना वेगळा नियम लागू करण्यात आला. जे परदेशी पर्यटक हवाई वा जहाजाद्वारे येतात. ते 25,000 रुपयांपर्यंतचे सामान शुल्कमुक्त आणू शकतात. हे सामान त्यांच्या सोबत हवे. त्यांच्या बॅगेत असावे.

सोन्याच्या दागिन्याविषयी काय बदल?

नवीन नियमांमध्ये सोन्याच्या दागिन्याविषयी नियम आणि सिस्टिम स्पष्ट केली आहे. Central Board of Indirect Taxes and Customs नुसार, जर एखादा भारतीय नागरिक अथवा भारतीय वंशाचा नागरिक एक वर्षापेक्षा अधिक काळापासून परदेशात राहत असेल तर तो भारतात परताना एका मर्यादीत संख्येत विना शुल्क सोन्याचे दागिने आणू शकतो.

महिला प्रवासी – 40 ग्रॅमपर्यंत सोने दागिने आणू शकते

पुरुष प्रवासी – 20 ग्रॅमपर्यंत सोने दागिने आणू शकते

लॅपटॉपबाबत मोठा दिलासा

नवीन नियमांचा टेक युझर्सला मोठा दिलासा मिळाला आहे. 18 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाचा कोणताही प्रवाशी क्रू सदस्य सोडून नवीन लॅपटॉप अथावा नोटपॅड सोबत आणू शकते. या वस्तू शुल्क मुक्त आणता येईल. पण हा लॅपटॉप वैयक्तिक वापरासाठी असावा ही अट आहे.  त्यामुळे आता पूर्वीपेक्षा 25,000 रुपयांची अतिरिक्त वाढीची संधी भारतीय नागरिकांना मिळाली आहे. त्यांना 75,000 रुपयांच्या वस्तू आणू शकतील. इतक्या रुपयांचे दागिने त्यांना भारतात आणता येऊ शकता. त्यावर शुल्क आकारले जाणार नाही.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...