AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar | निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर; विजय वट्टेडीवरांचा हल्लाबोल

Vijay Wadettiwar | निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर; विजय वट्टेडीवरांचा हल्लाबोल

| Updated on: Feb 03, 2026 | 12:45 PM
Share

निवडणूक प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी पक्षाकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वट्टेडीवर यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात त्यांच्या पक्षातील सहा नगरसेवकांची महत्त्वाची प्रमाणपत्रे निकाल जाहीर झाल्यानंतर अचानक हरवली होती. संबंधित प्रमाणपत्रे हरवल्यानंतर त्यांनी रीतसर पोलीस ठाण्यात जाऊन ‘मिसिंग’ची तक्रार दाखल केली होती.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी पक्षाकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वट्टेडीवर यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात त्यांच्या पक्षातील सहा नगरसेवकांची महत्त्वाची प्रमाणपत्रे निकाल जाहीर झाल्यानंतर अचानक हरवली होती. संबंधित प्रमाणपत्रे हरवल्यानंतर त्यांनी रीतसर पोलीस ठाण्यात जाऊन ‘मिसिंग’ची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची प्रत घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यानंतरच ती प्रमाणपत्रे पुन्हा मिळाली.  नोंदणी प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारची प्रमाणपत्रे सादर करण्याची कोणतीही कायदेशीर आवश्यकता नसताना, जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या गेल्या, असे वट्टेडीवर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात थेट निवडणूक आयुक्तांवरही त्यांनी निशाणा साधला. “हे आयुक्त पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत,” अशी  टीका विजय वट्टेडीवर यांनी केली आहे.

Published on: Feb 03, 2026 12:45 PM