NCP| अजित पवारांनंतर कोणाकडे जाणार महत्त्वाची पदे? पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाचं काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या पदांचे पुढे काय होणार? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत चित्र वेगळे असू शकते.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या पदांचे पुढे काय होणार? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत चित्र वेगळे असू शकते. बीडची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती, ती आता दुसऱ्या मंत्र्याकडे सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अजित पवार यांच्याकडे असलेल्या काही पदांसाठी पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सत्ताधारी आघाडीतही अंतर्गत हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. कोणत्या नेत्याला कोणती जबाबदारी मिळणार? यावरून राजकीय समीकरणे बदलू शकतात. याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
Published on: Feb 03, 2026 12:30 PM
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या!लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष...
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय

