15 ऑगस्टसाठी खिलाडीची दिग्गजांची फौज, नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

15 ऑगस्टसाठी खिलाडीची दिग्गजांची फौज, नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज


मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत हे पोस्टर शेअर केलं. या पोस्टरसह चित्रपटाच्या प्रमोशनलाही सुरुवात झाली आहे. जगन शक्ती यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारताच्या मिशन मंगलची गोष्ट उलगडणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मोठी स्टारकास्ट दिसणार आहे. यात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, निथ्या मेनन, किर्ती कुल्हारी आणि शर्मन जोशी यांचा समावेश आहे. या सर्वांची चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार आहे. पोस्टरवर हे सर्वच पाहायला मिळत आहेत. तरण आदर्श यांनी पोस्टर शेअर करताना म्हटले, “मिशन मंगल हा चित्रपट अशा व्यक्तीची कहानी आहे जो भारताला मंगळावर घेऊन गेला. मिशन मंगल भारताच्या मंगळावरील अंतराळ अभियानाची खरी गोष्ट आहे.” या चित्रपटाच्या पोस्टरवर अक्षय कुमारचा हटके लुक पाहायला मिळत आहे.

मागील काही काळापासून अक्षय कुमार देशभक्ती आणि सामाजिक विषयांशी संबंधित चित्रपटांची निवड करत आहे. मिशन मंगल हा चित्रपटही त्याच्या याच निवडीचा भाग मानला जात आहे. अक्षयने मागील काळात केसरी, पॅडमॅन, एअरलिफ्ट, टॉयलेट-एक प्रेम कथा, बेबी असे अनेक चित्रपट केले. त्याआधी अक्षयने अनेक विनोदी चित्रपटांचीही निवड केली होती. यात हाउसफुलसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI