Akshay Kumar Birthday | ‘अक्की’च्या वाढदिनी यशराजची मोठी घोषणा, भव्य दिव्य ‘पृथ्वीराज’चा टीझर रिलीज

अक्षय कुमारच्या आगामी (Akshay Kumar Birthday) ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे.

Akshay Kumar Birthday | अक्कीच्या वाढदिनी यशराजची मोठी घोषणा, भव्य दिव्य पृथ्वीराजचा टीझर रिलीज
| Updated on: Sep 09, 2019 | 10:43 AM

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar Birthday) आज वाढदिवस आहे. अक्कीच्या बर्थ डेनिमित्त यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमारच्या आगामी (Akshay Kumar Birthday) ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे.

भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद असलेले सम्राट पृथ्वीराज चौहान (Prithviraj Chauhan) यांच्यावर पृथ्वीराज (Prithviraj) हा सिनेमा आधारित आहे. अक्षय कुमार या सिनेमात पृथ्वीराज चौहानांची भूमिका साकारत आहे. आपला हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे, त्यामुळे आपण प्रचंड उत्सुक असल्याचं अक्षय कुमारने म्हटलं. पुढील वर्षी दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज फिल्म्सची निर्मिती आणि डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

अक्षय कुमारने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. “माझ्या वाढदिनी माझ्या पहिल्या ऐतिहासिक सिनेमाचा टीझर शेअर करताना आनंद होत आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. या सिनेमातून त्यांचं शौर्य आणि त्यांनी रुजवलेली मूल्ये या माझ्या सर्वात मोठ्या सिनेमापैकी एक असलेल्या पृथ्वीराज सिनेमात पाहायला मिळतील. यशराज फिल्म्सची निर्मिती आणि डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 2020 मधील दिवाळीत हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येईल”