AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, परदेशात प्रवास न केलेल्या महिलेचा मृत्यू

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला (Pune Corona Patient died) आहे. पुण्यात एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, परदेशात प्रवास न केलेल्या महिलेचा मृत्यू
| Updated on: Apr 02, 2020 | 9:30 PM
Share

पुणे : पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला (Pune Corona Patient died) आहे. पुण्यात एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नुकतंच पुण्याचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी याबाबतची माहिती दिली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित  मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे.

पुण्यात मृत्यू झालेल्या या महिलेचा काल कोरोनाचा रिपोर्ट (Pune Corona Patient died) पॉझिटिव्ह आला होता. या महिलेने कोणताही परदेशी प्रवास केला नव्हता. आज पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

तर दुसरीकडे जळगावमध्ये आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये मृत्यू झालेल्या या रुग्णाचा अहवाल काल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यात आतापर्यंत 20 जणांना कोरोनामुळे जीव गमावावे लागले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील असून मुंबईत आतापर्यंत 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. तर पुणे, नवी मुंबई, बुलडाणा, पालघर, जळगाव या ठिकाणी प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल अन्य एकाचा मृत्यू – 2 एप्रिल अन्य एकाचा मृत्यू – 2 एप्रिल पुणे : 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 416 वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत 20 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले (Pune Corona Patient died) आहेत.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..