AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भवानी पेठ, ढोले पाटील, शिवाजीनगर परिसराला कोरोनाचा विळखा, पुण्यात कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?

पुण्यातील भवानी पेठेत सर्वाधिक 400 रुग्ण आहेत. तर त्यापाठोपाठ ढोले पाटील रोडवरील 322 कोरोना रुग्ण (Pune Ward Wise Corona Patient) आहेत. 

भवानी पेठ, ढोले पाटील, शिवाजीनगर परिसराला कोरोनाचा विळखा, पुण्यात कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?
| Updated on: May 06, 2020 | 9:31 AM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 201 वर आली (Pune Ward Wise Corona Patient) आहे. यातील पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा 1,943 वर पोहोचला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. येत्या दोन आठवड्यात पुणे शहरातील कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे शहरातील 15 पैकी 5 क्षेत्रीय कार्यालय परिसरात 73 टक्के कोरोनाबाधित (Pune Ward Wise Corona Patient) रुग्ण आढळले आहेत. यात भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग वाडा, येरवडा-धानोरी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरातील एकूण 46 प्रभागापैकी 8 प्रभागात 50 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.

पुणे शहरात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता शहरातील 13 प्रयोगशाळांमध्ये 1200 पर्यंत चाचण्यांची क्षमता आहे. मात्र आता ती 1700 पर्यंत वाढवता येऊ शकते, अशी माहिती पुणे जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

हेही वाचा – पिंपरी चिंचवडला ‘कोरोना’चा विळखा, तळवडे-चिखलीत 34 रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

पुणे शहरात काल (5 मे) पर्यंत सर्व प्रभागात एकूण 1949 रुग्ण आहेत. यातील 1944 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

त्यानुसार पुण्यातील भवानी पेठेत सर्वाधिक 400 रुग्ण आहेत. तर त्यापाठोपाठ ढोले पाटील रोडवरील 322 कोरोना रुग्ण आहेत.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या

भवानी पेठ – 433 (सर्वाधिक) ढोले पाटील – 322 शिवाजीनगर – 243 येरवडा – 217 कसबा – 172 धनकवडी – 124 वानवडी – 104 बिबवेवाडी – 76 हडपसर – 58 नगररोड – 57 कोंढवा – 33 सिंहगडरोड – 16 वारजे-कर्वेनगर – 11 कोथरूड – 5 औंध-बाणेर – 4 पुण्याबाहेरचे – 70

एकूण 1949

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (5 मे) 79 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 2,201 वर येऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  यामुळे कोरोनाबळींची संख्या 120 वर गेली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीत दिवसभरात 65 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1,943 वर पोहोचला आहे. तर  दुसरीकडे पुण्यात दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील मृत्यूंची संख्या 111 वर पोहोचली. तर 76 रुग्ण अतिगंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातील 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात सध्या 1,297 रुग्ण अॅक्टिव्ह (Pune Ward Wise Corona Patient) आहेत.

संबंधित बातम्या : 

Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती

पुण्याबाहेर जाणाऱ्या 68 हजार जणांची यादी तयार, स्वखर्चाची अट

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल