ड्रोनच्या सहाय्याने 27 जणांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन करण्यात (Pune Police action with drone camera) आले आहे.

ड्रोनच्या सहाय्याने 27 जणांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
| Edited By: | Updated on: Apr 02, 2020 | 11:04 AM

पुणे : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन करण्यात (Pune Police action with drone camera) आले आहे. लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. तसेच हे रस्त्यावर फिरणारे पोलीस आले की लपून बसायचे आणि पोलीस गेले की पुन्हा मोकाट फिरायचे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवत रस्त्यावर फिरणाऱ्या 27 लोकांवर गुन्हे दाखल (Pune Police action with drone camera) केले आहेत.

लॉकडाऊन घोषित करुनही लोक रस्त्यावर फिरत होते. नागरिक लॉकडाऊनला फारसे गांभिर्याने घेत नसल्याने पुण्याच्या ग्रामीण भागातील यवत पोलिसांनी थेट जमिनीवरुन नव्हे तर थेट आकाशातून ड्रोनद्वारे नजर ठेवली.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाउन आहे. अत्यावश्यक सेवा वगळल्या तर सर्वच बंद आहे. आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असे पोलिसांकडून आवाहन केले जात आहे. मात्र काही जण मोकाट रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने अशांवर आता पोलीस ड्रोनने नजर ठेवत आहेत.

विनाकारण फिरणे आता काही नागरिकांच्या चांगलेच आंगलट आले आहे. पाटस, बोरिएंदी, कडेगाव, वरवंड, नाथाची वाडी, खामगाव अशा ग्रामीण भागातील एकूण 27 जणांवर लॉकडाऊनचे आदेश तोडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. या रोख लावण्यासाठी लोकॉडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात सध्या 300 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर देशात 1600 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.