राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, विकास कामे सुरु करण्याची शिवप्रेमींची मागणी

जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजवाड्याची दुर्दशा झाली आहे. (Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja in Bad condition) 

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, विकास कामे सुरु करण्याची शिवप्रेमींची मागणी
| Updated on: Sep 20, 2020 | 5:10 PM

बुलडाणा : कोरोनाच्या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, आता अर्थव्यवस्थेला बसलेली खिळ पाहता देश अनलॉक करण्यात येत आहे. तर राज्यामध्ये पूर्णपणे अनलॉक करण्यात आला आहे. मात्र अजूनही तीर्थक्षेत्र आणि ऐतिहासिक स्थळे बंद असल्याने या ऐतिहासिक स्थळांची मोठी दुरवस्था झाली आहे. (Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja in Bad condition)

महाराष्ट्राची अस्मिता असलेले माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजवाड्याची दुर्दशा झाली आहे. या राजवाड्यात गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोरोनाच्या आधी सुरू असलेले बांधकाम बंद असल्याने आता हे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहे. पाच महिन्यात राजवाड्यात सर्व सामान्य नागरिकांपासून शासनाचा एकही कर्मचारी फिरायला आला नसल्याने ही दुर्दशा पाहायला मिळत आहे.

अनेक राजकीय पक्षांनी घोषणा करत जिजाऊ सृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा देखील तयार करण्यात आला होता. मात्र त्यासाठी अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. स्वतंत्र विकास प्राधिकरण अंतर्गत शहरातील विविध ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्ती आणि डागडुजीसाठी साडेबारा कोटी रुपये मंजूर झाले होते.

याचे कामही प्रत्यक्षात सुरू झाले होते. मात्र लॉकडाऊन आणि कोरोना असल्याकारणाने गेल्या पाच सहा महिन्यापासून जिजामाता राजवाड्यातील कामासह इतर सर्वच कामे बंद आहेत. त्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे राजवाड्याची झालेली दुर्दशा थांबवून विकास कामे सुरू करावीत, अशी मागणी शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमींकडून केली जात आहे. (Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja in Bad condition)

संबंधित बातम्या : 

Covishield Vaccine | ‘कोविशील्ड’ लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा