राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी, जनाधार नाही : रामदास आठवले

"मनसेला जो जनाधार आहे तो निवडून येणारा जनाधार नाही. राज ठाकरे यांच्या फक्त सभांनाच गर्दी होते. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि भूमिका बदलली तरी मनसेला त्याचा राजकीय फायदा होणार नाही", असे रामदास आठवले म्हणाले.

राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी, जनाधार नाही : रामदास आठवले
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 9:03 AM

रत्नागिरी : “मनसेला जो जनाधार आहे तो निवडून येणारा जनाधार नाही. राज ठाकरे यांच्या फक्त सभांनाच गर्दी होते. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि भूमिका बदलली तरी मनसेला त्याचा राजकीय फायदा होणार नाही”, अशी टीका रिपाईचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले (Ramdas Athawale on MNS) यांनी केली आहे. “मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा जर मनसेनं सोडला तर मनसेचं अस्तित्वच संपून जाईल”, असेदेखील रामदास आठवले (Ramdas Athawale on MNS) म्हणाले.

“झेंडा कोणता घ्यायचा तो अधिकार राज ठाकरेंना आहे. झेंड्याचा फक्त रंग बदलून चालणार नाही. मनसैनिकांनी आपली मनंदेखील बदलली पाहिजेत. उत्तर भारतीयांबद्दलच्या भूमिकेत बदल केला पाहिजे. उत्तर भारतीयांना मुंबईमध्ये राहण्यासाठी विरोध करणारी मनसे आहे. त्या मनसेने जरी झेंड्याचा रंग बदलला तरी त्याचा फारसा राजकीय फायदा होणार नाही”, असे रामदास आठवले म्हणाले.

“हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आलेले आहेत. त्यांनी आता 56 जागा निवडून आणल्या आणि मागच्या वेळेला भाजपच्या विरोधात लढून 63 जागा निवडून आणल्या होत्या. त्यातच मनसेचा एकच आमदार आहे. त्यामुळे भगवा रंग फक्त भाजप आणि शिवसेनेसोबत राहील”, असे रामदास आठवले म्हणाले.

“भाजप आणि मनसे एकत्र येणार नाही आणि जरी एकत्र येण्याचा प्रयत्न झाला तरी त्याचं नुकसान हे भाजपला जास्त होईल. त्यामुळे भाजप आणि मनसे यांनी हातमिळवणी करु नये. भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष मोठ्या ताकदीने उभा आहे. यामध्ये दलितांची बहुजनांचे मत वळवण्यात रिपब्लिकन पक्ष हा चमकदार आहे. मनसेबरोबर भाजप गेल्यास देशभरात भाजपचे नुकसान होईल”, असे रामदास आठवले म्हणाले.

मनसेने येत्या 23 जानेवारीला महाअधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही महत्त्वाच्या घोषणा करणार आहेत. या अधिवेशनातच मनसैनिकांच्या हातात पक्षाचा नवा झेंडा पडणार आहे. मनसे या अधिवेशनात काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांसोबत युती करुन सरकार स्थापन केले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांची हिंदुत्वाबाबतची भूमिका वेगवेगळी आहे. शिवसेनेची हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख आहे. मात्र, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे शिवसेनेचे काही समर्थक नाराज झाले आहेत. शिवसेनेच्या अशा समर्थकांना वळवण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात आहे. त्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा पकडत पुढची राजकीय वाटचाल करणार असल्याचे दिसत आहे.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.