उस्मानाबादेत अनाथ विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 शिक्षक, शिपायावर गुन्हा 

उस्मानाबाद: नात्याला काळिमा फासणारी घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. मावशीच्या नवऱ्याने तसंच शाळेतील तीन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लोहारा तालुक्यात घडली. धक्कादायक म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अनाथ आहे.   याप्रकरणी लोहारा पोलिसात 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. […]

उस्मानाबादेत अनाथ विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 शिक्षक, शिपायावर गुन्हा 
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

उस्मानाबाद: नात्याला काळिमा फासणारी घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. मावशीच्या नवऱ्याने तसंच शाळेतील तीन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लोहारा तालुक्यात घडली. धक्कादायक म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अनाथ आहे.   याप्रकरणी लोहारा पोलिसात 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 1 आरोपी फरार आहे. मावशी नवरा फरार असल्याचं कळतंय.

पीडित मुलगी लोहारा तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत शिकते. बलात्कार करणाऱ्यांमध्ये तीन शिक्षक, एक शिपाई, कृषी विभागाचा कर्मचारी, असे 5 जण असून पीडीत मुलीच्या मावशीच्या नवऱ्याच्याही आरोपीमध्ये समावेश आहे.

हे सर्व नराधम 2013 सालापासून मुलीवर अत्याचार करीत होते, असा आरोप आहे. आरोपी विक्रम काजळे, सुयश जोशी, जयराम मोरे, नागनाथ कोकाटे, दत्ता जमदाडे आणि विजय तोडकर यांच्यावर गुन्हा नोंद असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपींना आज उमरगा कोर्टात हजर केले जाणार आहे.

तब्बल 5 वर्षांपासून मुलीवर अत्याचार सुरु होते, अशी माहिती समोर येत आहे. शिक्षक आणि शिपायांचं या कृत्याचा फटका आणखी किती मुलींना बसला आहे, हे गुलदस्त्यात आहे. पोलीस सध्या तपास करत असून, या शिक्षण संस्थेतील आणखी कोणी मुली बळी ठरल्या आहेत का त्याचा तपास सुरु आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.