अपक्ष उमेदवाराला निवडून देऊ नका, कारण…; नितीन गडकरी यांचा निशाणा कुणावर?

Nitin Gadkari on Vishal Patil Sangali Loksabha Election 2024 : सांगलीच्या जतमध्ये महायुतीची सभा झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सभेला उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं. नितीन गडकरी यांनी या सभेत नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...

अपक्ष उमेदवाराला निवडून देऊ नका, कारण...; नितीन गडकरी यांचा निशाणा कुणावर?
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 7:40 PM

सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी जत शहरामध्ये महायुतीची सभा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे. आम्हाला हा देश घडवायचा आहे. या देशाचे भविष्य घडवायचा आहे. केवळ राजकारणामध्ये निवडणुका लढवायला आम्ही आलो नाही. ही जनता आहे. त्याला सगळे माहिती असते. कोणत्याही भानगडीत पडू नका. अपक्ष उमेदवाराला निवडून आणू नका. कारण अपक्ष न घर का ना घाट का असतो,अशी अवस्था होते, असं म्हणत नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना टोला लगावला आहे.

विरोधकांना प्रत्युत्तर

आमच्या सरकारने न्यानो युरिया आणला ड्रोन आणले आणि याच्या माध्यमातून पिकांना दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे बचत होऊ लागली. शेतकरी अन्नदाता, इंधन दाता, आता हवाई दाता सुद्धा शेतकरी बनेल. तुम्हाला वाटत असेल मी काहीही बोलतो. पण मी जे बोलतो ते करून दाखवतो. काँग्रेसने भाजप संविधान बदलणार असा खोटा प्रचार सुरू केला आहे. पण कुठल्याही सरकारला हे बदलता येत नाही. बाबासाहेबांचे संविधान तोडायचं पाप कोणी केला असेल तर ते काँग्रेसने केला आहे. ज्या बाबासाहेबांचं संविधान तोडलं ते आमच्याबद्दल अपप्रचार करतात, असं म्हणत नितीन गडकरी यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

सांगलीकरांना आवाहन

या देशामध्ये पाण्याची कमी नाही. पण मी शेतकरी आहे मला माहित आहे कीस पाण्याकरिता सर्व गोष्टी आहेत. शेतकऱ्याला समृद्ध करायचा असेल. गाव समृद्ध संपन्न करायचे असेल. स्मार्ट विले निर्माण करायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याला पाणी मिळायलाच पाहिजे. तर ग्रामीण भागात सूत्र बदलून जाईल. पुन्हा एकदा संजय काका यांना निवडून द्या. तुमचे राहिलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीतय सही खेल सुरू होना अभी बाकी है… तुम्ही संजय काका मला आणि मोदीजींना मत दिलं. त्यामुळे आजपर्यंत एवढी काम केली.आता परत एकदा आम्हाला निवडून द्या, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.

जतमध्ये आलो तर आज सगळीकडे हिरवीगार झाडी बघून मला खूप आनंद झाला. संजय पाटील माझ्याकडे वारंवार आले आणि ते मागणी करत होते.प्रकल्प सुरू झाले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रामधले जे सिंचन योजनेचे प्रकल्प बंद पडले होते. त्याला गती देण्यासाठी आम्ही बळीराजा जलसंजीवनीमधून आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्याने ताकारी म्हैसाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील योजनांना 6 हजार कोटी रुपये दिले, असंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.