AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं चॅलेंज आहे की…; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना आव्हान

Supriya Sule on Ajit Pawar and Baramati Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील दौंडमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना आव्हान दिलं. वाचा सविस्तर...

माझं चॅलेंज आहे की...; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना आव्हान
| Updated on: May 04, 2024 | 7:21 PM
Share

तुम्हाला बोलणारा खासदार पाहिजे की ताट वाजवणारा? हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. बोलणार हवा असला तर आपली तुतारी वाजलीच. माझ्यावर टीका करायला काही नाही म्हणून अशी टीका करतात. माझं चॅलेंज आहे की मी किती वेळा दौंडमध्ये आले आणि तुम्ही किती वेळा दौंडमध्ये आला आहात. याचा हिशोब काढा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पुण्यातील दौंड तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

दौंडकरांना आश्वासन काय?

दौंडला मी महिन्यातून एकदा तरी येतेच. मी आभार मानते की तीन वेळेस मला संसदेत जायची संधी दिली माझं चिन्ह आता बदलला आहे. मी पक्ष नाही. बदलला चिन्ह बद्दललं आहे… दौंडमध्ये एकत्रित काम आपण केलं. लोक माझ्यावर टीका करत आहेत. म्हणतात की भाषण करून विकास होत नाही. माझं म्हणणं आहे की भाषण करूनच विकास होत कारण ही लोकशाही आहे. तुमचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी मी भाषण करते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सभेला संबोधित केलं.

कोण पाणी अडवतं ते बघतेच- सुळे

आज दौंडमध्ये दमदाटी करत आहेत. पाणी बंद होईल म्हणून… धमक्या देतात. पाणी तुमच्या घरचं नाही. कॅनल तुमच्या घरचा नाही. हे पाणी माझ्या शेतकऱ्यांचा आहे. कुणीच माईका लाल दौंड आणि बारामतीचे पाणी बंद करतो ते बघते. तुमचा ऊस पण कुणी अडवणार नाही. कसं अडववतात ऊस तेच बघते. कुणीही उसामध्ये गडबड केली तर तुमच्यासाठी आंदोलन मी करेन माझा शब्द आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी स्थानिकांना आश्वासन दिलं.

रात्र वैऱ्याची आहे पुढील दोन चार दिवस काय होईल ते सांगता येत नाही. लक्ष असू द्या. सरस्वती लक्ष्मी अन्नपूर्णा सगळेच येतील. उद्या इथला प्रचार संपला की शिरूरला अमोल दादा ची तुतारी वाजवायला जायचं आहे… कोणीही आराम करू नका. आपल्याला भरपूर काम आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.