AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भास्कर जाधवांकडून अजित पवारांची मिमिक्री; म्हणाले, आता दादागिरी संपली…

Bhaskarrao Jadhav on Ajit Pawar and Baramati Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पाश्वभूमीवर महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी भास्करराव जाधव यांनी संबोधित केलं. नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

भास्कर जाधवांकडून अजित पवारांची मिमिक्री; म्हणाले, आता दादागिरी संपली...
| Updated on: May 04, 2024 | 6:30 PM
Share

बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली. तुमच्यावर कोण दादागिरी करत आहे? कोण दादा? आता लोकांना माहिती नाही की दादा कोण? पूर्वी पवार साहेबांसोबत होते म्हणून ते अजितदादा… आता दादा फक्त नाव राहिलं आहे. दादागिरी निघून गेली आहे. आता दिल्लीतून गब्बरसिंग फोन करतात आणि म्हणतात अजित इकडं ये… दादा आणि दादागिरी हा विषय आता संपला आहे, असं म्हणत भास्कर जाधव यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री केली.

भाजपवर निशाणा

भास्कर जाधव यांनी नरेंद्र मोदी यांची देखील मिमिक्री केली. 10 वर्षात नरेंद्र मोदींनी काय केलं? नरेंद्र मोदी आणि अमित शाह राज्यात येतात आणि पवार साहेबांना प्रश्न विचारातात. की एवढ्या वर्षात काय केलं? अरे राज्य तुम्ही चालवत आणि प्रश्न आम्हाला विचारता? यांना सत्तेतून खाली ओढा. सत्तेत राहायचा यांना अधिकार नाही. देश आणि राज्य आम्ही चालवू. 4 जूनला देशात इंडिया आघडीचे सरकार येईल. भाषणं करून विकास होणार नाही, असं म्हणत असतील. तर ताई वाईट वाटून घेऊ नका. आता तुम्ही मंत्री व्हाल आणि उत्तर द्याल, असं भास्करराव जाधव म्हणाले.

दौंडकरांना काय आवाहन?

7 तारखेला सुप्रिया सुळे यांना लाखोच्या मताने विजयी करा. तुतारी वाजलीच पाहिजे. मी उभा महाराष्ट्र फिरून आलोय. राज्य पालथं घातलं आहे. लक्षात आलं की या राज्यात अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेसोबत गद्दारी झाली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. 40 आमदार घेऊन गेले. राज्य आपलं स्वाभिमानी आहे. आता मला खात्री आहे की राज्यात 35 तरी आपल्या जागा येतील, असं आवाहन भास्करराव जाधव यांनी दौंडकरांना केलं आहे.

भटकता आत्मा अन् अतृप्त आत्मा

पवारसाहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आले होते. त्यावेळेस मी पाय धरले आणि सांगितलं की साहेब मी चुकलो. पण साहेबांनी मलावर घेतला आणि सांगितलं की अशी चूक पुन्हा करू नकोस. माझी चूक मी कबूल करतोय, याचा मला काही कमीपणा नाही. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका साहेबांना खूप दुःख होईल. महाराष्ट्राच्या सह्याद्रीची मान खाली जाऊ देऊ नका. मोदीसाहेब तयारी ठेवा, शरद पवारसाहेब तुम्हाला हिमालयात पाठवतील. भटकता आत्मा म्हणाले मोदी तुम्हाला आवडलं का? अतृप्त आत्मा तर तुमचा आहे. सत्ता दिली तरी जनतेचा विकास तुम्ही केला नाही. म्हणाल की छोट्या पार्ट्या ठेवायचा नाहीत, म्हणून भटकत आत्मा तुमचा आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.